नळ पाणी पुरवठा योजनेच्या विस्कळीतपणा विरोधात नांदगावात रास्ता रोको आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

या आंदोलनामुळे मालेगाव रस्त्यावरील वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाला आंदोलनाला निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी व मुख्याधिकारी अजित निकत सामोरे गेले.

नांदगांव - गिरणा धरणावरील 56 खेडी नळ पाणी पुरवठा योजनेच्या विस्कळितपणामुळे नांदगाव शहर व तालुक्याच्या सतरा गावात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणी टंचाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामुळे मालेगाव रस्त्यावरील वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाला आंदोलनाला निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी व मुख्याधिकारी अजित निकत सामोरे गेले. मात्र योजनेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पाठ फिरविल्याने उपअभियंता प्रकाश बोरसे यांच्या वर्तनाचा आंदोलकांनी निषेध नोंदविताना अनेक वर्षांपासून योजनेचे काम बघणाऱ्या बोरसे यांच्या कार्यपद्धतीवर यावेळी टीका करीत त्यांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी केली शहरात पाणी वितरणात होणारा दुजाभाव का होतो याकडे मुख्याधिकारी निकत यांचे लक्ष वेधले पाणी पुरवठ्याचे नियोजन व वेळा पत्रक तयार करावे, शहरातील विंधन विहिरींवरील हातपंप दुरुस्त करण्यात यावे, ज्या हातपंपाना जास्त प्रमाणात पाणी आहे त्या विंधनविहिरीवर जलपरी मोटार बसविण्यात याव्यात, माणिकपुंज धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे आदी मागण्या करण्यात आल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सीमा राजुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब सूर्यवंशी आदींनी आपले मनोगत मनोगत व्यक्त केले. 

नगरसेवक इक्बाल शेख, वाल्मिक टिळेकर, सुरज पाटील, नगरसेविका योगिता गुप्ता, भारती गायकवाड, सतीष अहिरे, तुळसाबाई महाजन, शोभा आहेर, कमल सोनवणे, सुमन घोडेराव, मंगला विसपुते, रमा साळुंके, मालू पाटील, मुक्ताबाई माळी,सुमन पवार, विलास राजुळे, सुरेश दंडगव्हाळ, महेंद्र गायकवाड, अमित बोरसे, सागर आहेर, पृथ्वी पाटील, राहुल भोपळे, मुश्ताक खलिफ, कासीम शेख, सैय्यद फिरोज, मुकुंद खैरनार, बाळासाहेब महाजन, सावताराम माळी, अशोक पाटील, राजेंद्र लाठे, महेंद्र गायकवाड, गणेश चौधरी, राजेंद्र आहेर, चंद्रभान फुलमाळी, मुजमिल शेख आदी सहभागी झाले. आंदोलनाला स्वाभिमानी युथ पब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष कपिल तेलुरे, माया उशिरे, स्वाती पवार व भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, शहर अध्यक्ष उमेश उगले, स्वप्निल शिंदे, कृष्णा त्रिभुवन यांनीही जाहीर पाठिंबा दिला.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Rasta Roko Agitation At Nandgaon