नांदगावला हमीभावासाठी "रास्ता रोको'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नांदगाव - कांद्याला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव देण्यात यावा, उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू ठेवावी, पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ मिळावेत, चारा खरेदीसाठी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हाव्यात आदी मागण्यांसाठी गुरुवारी (ता. 29) स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम आदमी पक्षाच्या वतीने येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्यांचे संयुक्त रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास कर्मचाऱ्यांना कोंडून टाळे लावण्याचा इशाराही देण्यात आला.
Web Title: Rasta Roko in Nandgaon for Onion Guarantee rate