"रतन इंडिया'समोर गेटबंद आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सिन्नर - तालुक्‍यातील गुळवंच शिवारातील रतन इंडिया या औष्णिक वीज प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी काल सकाळी कंपनीसमोर गेटबंद आंदोलन सुरू केले. या वेळी कंपनी व्यवस्थापन, आमदार राजाभाऊ वाजे आणि कामगार प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा होऊन मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

कंपनीच्या अंतर्गत कामे करणाऱ्या इतर कंपन्यांनी कंत्राटी पद्धतीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नियमाप्रमाणे वेतनवाढ द्यावी, रतन इंडिया कंपनीत कायमस्वरूपी घ्यावे या मागणीसाठी गेटबंद आंदोलन करत एकाही कामगार व अधिकाऱ्यांना कंपनीत जाऊ द्यायचे नाही, अशी भूमिका घेतली. व्यवस्थापनातर्फे संपतकुमार, अभिमन्यू राठोड व शिसिर महोपात्रा यांनी तातडीने गेटजवळ येत आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावत तोडगा काढण्याची बोलणी केली. कामगार प्रतिनिधी निवृत्ती सांगळे, सचिन शेळके, बाळू सांगळे आदींनी आपली भूमिका मांडली. या वेळी फक्त नऊशे रुपयांची वाढ देण्याचे व्यवस्थापनाने सांगितले. यावर समाधान न झाल्याने तोडगा निघाला नाही. आंदोलनाच्या ठिकाणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी येऊन कामगारांच्या प्रश्‍नात मध्यस्थी करण्याची भूमिका घेऊन त्यांना तातडीने एक हजार रुपयांची वाढ आणि मार्चनंतर पाचशे रुपयांची वाढ करण्याचे आश्‍वासन, तसेच एक युनिट सुरू झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याचे आश्‍वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यांनतर कामगारांचे समाधान झाल्याने आंदोलन मागे घेतले.

Web Title: Ratan India movement in front of getabanda