रेशन दुकानदारांना तूरडाळ विक्रीची पुन्हा सक्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नाशिक - खरेदी करून ठेवलेली तूरडाळ खपवण्यासाठी रेशन दुकानदारांना पुन्हा एकदा तूरडाळ विक्रीची सक्ती करण्यास सुरवात झाली आहे. मात्र, जुनी, लवकर न शिजणारी डाळ विकत घेण्यास ग्राहक नाखूष असल्याने डाळ खपवण्याचे मोठे आव्हान दुकानदारांपुढे उभे ठाकले आहे.

गेल्या तीन वर्षांपूर्वी तूरडाळीचे उत्पादन कमी झाल्याने भाव किलोला दोनशे रुपयांपर्यंत भिडले होते. त्यामुळे राज्य सरकारने तूरडाळ रेशन दुकानातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. पुढे तूरडाळीचे भाव कमी झाले आणि चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढले. आता घाऊक बाजारात सर्वोत्तम दर्जाची तूरडाळ 65 रुपये किलो भावाने मिळते. किरकोळ बाजारात ती 70 ते 75 रुपयांमध्ये विकली जात आहे. रेशन दुकानातील डाळीचा भाव 55 रुपये किलो असा आहे. रेशनमधील तूरडाळ ही दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेली आहे. मुळातच, तूरडाळ जशी जुनी होते तशी ती शिजण्यात अडचणी येतात, असा गृहिणींचा अनुभव आहे. परिणामी, आता रेशनच्या तूरडाळीला गृहिणींची नापसंती असल्याचे दुकानदार सांगतात.

Web Title: ration shop turdal sailing compulsory