अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून केळी बागांची पाहणी 

raver banana afganisthan
raver banana afganisthan

रावेर : अफगाणिस्तान येथील माजी मंत्री डॉ. सना अहमदझाई यांनी आज तालुक्यातील आटवाडा आणि तांदलवाडी येथील केळी बागांना भेट देऊन पाहणी केली. डॉ. अहमदझाई इंग्लंडमधील यॉर्कशायर विभागातील आंतरराष्ट्रीय मदत व पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत. 

जैन इरिगेशनच्या निर्यात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक एस. आर. बालसुब्रमण्यम, जैन फार्म फ्रेशचे राहुल भारंबे, अटवाडा येथील केळी निर्यातदार शेतकरी व रुची बनाना एक्सपोर्ट्सचे संचालक विशाल अग्रवाल, त्यांचे सहकारी संजय पाटील यावेळी उपस्थित होते. डॉ. अहमदझाई यांनी तांदलवाडी (ता. रावेर) येथील प्रशांत महाजन आणि प्रेमानंद महाजन यांच्या केळी बागांनाही भेटी देऊन पाहणी केली. 

अफगाणिस्तानमध्ये ग्रीनहाऊस निर्मिती आणि भाजीपाल्याचे उत्पादन करण्यासाठी जिल्ह्यातील उच्च तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी ते जिल्ह्यात आले आहेत. याबाबत जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष के. बी. पाटील यांनी सांगितले, की अफगाणिस्तान सारख्या वाळवंटात डॉ. अहमदझाई यांनी ७० ते ८० ठिकाणी भाजीपाला आणि फळ शेतीसाठी जागा निश्चित केल्या आहेत. जैन इरिगेशनकडे त्यांनी तंत्रज्ञानाची मदत मागितली आहे. तिथे व्यवसाय वृद्धी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. डॉ. अहमदझाई यांना मदत करण्यात येईल, असे के. बी. पाटील यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com