दमानियांविरोधातील अटक वॉरंट मागे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

रावेर - माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करून बदनामी करणाऱ्या मुंबई येथील समाजसेविका अंजली दमानिया यांच्या विरोधात येथील न्यायालयाने पकड वॉरंट जारी करण्याच्या आतच हे वॉरंट मागे घेण्याचा दुसरा आदेश येथील न्यायाधीश डी. जी. मालवीय यांनी शुक्रवारी दिला. अटक वॉरंट आज तयार करून जारी करण्यात येणार होते. दमानिया पुढच्या सुनावणीच्या तारखेस हजर होणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी आज येथील न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे अंजली दमानिया यांची अटक टळली आहे. दमानिया यांचे वकील सुधीर कुळकर्णी आणि दिलीप बोरसे यांनी हे वॉरंट रद्द व्हावे म्हणून अर्ज केला होता.
Web Title: raver news jalgaon news anjali damania arrest warrant