ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कॉंग्रेसचा धडक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

फैजपूर : जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल तालुक्‍यासह सर्वच तालुक्‍यांमध्ये अती व प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी रावेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. 

फैजपूर शहरातील सुभाष चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. अंकलेश्वर- बुऱ्हाणपूर महामार्ग छत्री चौक ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार शिरीष चौधरी व शेतकरी यांच्या हस्ते प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात केलेल्या मागण्यांसदर्भात शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनाने शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी केली. आमदार चौधरी, माजी जि. प. सदस्य रमेश नागराज पाटील, माजी जिल्हा बॅंक संचालक राजीव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, जि प सदस्य प्रभाकर सोनवणे, जि. प. सदस्य सुरेखा पाटील, मसाका संचालक लिलाधर चौधरी यांच्यासह रावेर व यावल तालुक्‍यातील शेतकरी व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raver yawal farmer congress MLA shirish choudhari morcha