पटसंख्या नऊ असणारी शाळा बनली ‘आयएसओ’

रायते वस्ती - आयएसओ प्रमाणपत्र स्वीकारताना मुख्याध्यापक गोरख देवढे, शिक्षक शशिकांत पाटील. समवेत विद्यार्थी.
रायते वस्ती - आयएसओ प्रमाणपत्र स्वीकारताना मुख्याध्यापक गोरख देवढे, शिक्षक शशिकांत पाटील. समवेत विद्यार्थी.

पालखेड - रायतेवस्ती जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेची पटसंख्या तीन वर्षांपूर्वी अवघी नऊ होती. शाळा बंद पडण्याची भीती असताना शिक्षणप्रेमी, नागरिक, ग्रामपंचायत आणि शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सध्या पटसंख्या ३५ वर पोचली आहे. याच शाळेला नुकतेच गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून आयएसओ ९००१:२०१५ नामांकन प्राप्त झाले. येत्या शैक्षणिक वर्षात पटसंख्या ५० होण्याचा विश्‍वास मुख्याध्यापक गोरख देवडे यांनी व्यक्त केला.

अवघी तीन हजार रुपयांची रक्कम आणि लोकसहभागातून या शाळेच्या सुधारणेची सुरवात झाली. गेल्या दोन वर्षांत व्हॉट्‌सॲप, फेसबुक या सोशल माध्यमातून आणि प्रत्यक्षात तीन लाखांचा निधी उभा राहिला. यातून शाळा डिजिटल होण्यासोबतच रंगकाम, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पाच सीसीटीव्ही कॅमेरे, बहुउपयोगी साउंड सिस्टिम, वॉटर फिल्टर, वृक्षसंरक्षक जाळ्या, शाळा प्रवेशद्वार, संगणक, फर्निचर, स्टेज, मैदान सपाटीकरण, शोभिवंत झाडे, शाळा परिसरातील शंभर झाडांना ठिबक सिंचन, हॅंडवॉश स्टेशन, स्पोर्ट ड्रेस, बूट आदी सोयी-सुविधा उपलब्ध  करण्यात आल्या. माझा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत, भिंत दत्तक योजना, एक हात शाळेसाठी यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अँड्राइड टीव्ही, वाय-फाय सुविधा, संरक्षक कुंपण, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

शाळेला नुकतेच युनेस्को स्कूल क्‍लबचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. शासनाच्या शाळासिद्धी मूल्यमापनातही शाळेने ‘अ’ श्रेणी प्राप्त केली. शाळेला सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे मुख्याध्यापक देवढे, शिक्षक शशिकांत पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com