वास्तवाला भिडणारे लेखन वाचकांनी वाचाव : प्रा. वसंत डहाके

वास्तवाला भिडणारे लेखन वाचकांनी वाचाव :  प्रा. वसंत डहाके

सटाणा : साहित्य संस्कृती समाजाला दिशा देण्याचे कार्य करत असते. आजचा तरुण साहित्यिकांकडून धाडसाने समाजाचे प्रामाणिक वास्तव मांडले जात असताना कटकारस्थान करून त्यांच्या लिखाणाचा विपर्यास काढला जातो. आजच्या स्री साहित्यिकाच्या लेखनातून स्रियांचे वास्तव जगन व्यक्त होते. वास्तवाला भिडणारे लेखन जागृत वाचकांनी वाचायला हवं. प्रत्येक वाचक हा सुप्त लेखक असतो. त्यामुळे वाचक जो पर्यंत वाचन हा आमचा अधिकार आहे. हे म्हणण्याचे धाडस दाखवत नाही तोपर्यंत समाजातील वास्तव मांडणाऱ्या लेखकांची संकट दूर होणार नाहीत आणि समाजालाही दिशा मिळणार नाही, असे असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व चंद्रपूरच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वसंत डहाके यांनी आज रविवार (ता.३०) रोजी येथे केले.

येथील साहित्यायन संस्थेच्या २६ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंगल कार्यालयात प्रख्यात कवयित्री प्रभा गणोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. डहाके बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार प्रमोद हिले, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. व्ही. डी. पाटील, साहित्यायनचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे, सचिव बी. जे. पगार आदी उपस्थित होते.

प्रा. डहाके म्हणाले, आजच्या पिढीतील अनेक युवा साहित्यिकांनी यापूर्वी जुन्या साहित्यिकांनी समाजातील वास्तव मांडण्याच धाडस दाखवल नाही ते त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतेक संकट ही मानव निर्मित असल्यामुळेच सैरभैर व्हावे लागते. संकोचित वृत्तीमुळे मनुष्य आपले माणूसपण गमावून बसल्याचेही प्रा. डहाके यांनी स्पष्ट केले.

संमेलनाच्या उद्घाटक कवयित्री गणोरकर म्हणाल्या, समाजातील विचारांचा ओलावा टिकविण्यासाठी समाजात विचारांच्या बिया टाकल्यास विचारांची झाडे निर्माण होतील. विचार मांडणारी पुस्तके निर्माण होत आहेत. ते साहित्य समाजात पसरविण्याची गरज असल्याचेही गणोरकर यांनी स्पष्ट केले. आमदार चव्हाण यांनी साहित्यायन संस्थेसाठी सर्वतोपरी मदत देण्याचे जाहीर केले. तर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी साहित्यायनची स्वतःची वस्तू उभी करण्याचा आपला मानस असून लवकरच साहित्यायनच्या जागेसाठी संरक्षक भिंत बांधून अद्यावत अभ्यासिका उभारण्याची घोषणा केली. डॉ. पाटील यांचे भाषण झाले. साहित्यायनचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे यांनी प्रास्ताविक केले. आमदार दिपिका चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. पाटील आदींची भाषणे झाली. ज्योती भामरे संपादित 'साहित्यायनी' या स्मरणिकेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

दुपारसत्रात प्रा. शं. क. कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली 'मराठी साहित्यातील विनोद हरवत चालला आहे' या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये चंद्रकांत महामिने, प्रा. अनिल सोनार, नरेश महाजन यांनी सहभाग घेतला. यानंतर कवयित्री प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवीसंमेलनात नामवंत कवींनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या.
संमेलनास प्राचार्य हितेंद्र आहेर, डॉ. शुभदा माजगावकर, प्राचार्या सुलभा मराठे, प्रा. शं. क. कापडणीस, प्रा. बी. डी. बोरसे, रविंद्र भदाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, सीमा सोनवणे, एकनाथ पगार, पी. एस. परचुरे, बाबूलाल मोरे, सतीश चिंधडे, सोमदत्त मुंजवाडकर, सोपान खैरनार, किरण दशमुखे, काशिनाथ डोईफोडे, पांडुरंग सावळा, पुष्पलता पाटील, ज्योती जाधव, कल्पना पंडित, प्रल्हाद पाटील, नगरसेविका डॉ.विद्या सोनवणे, अशोक बच्छाव, डॉ. जयवंत महाले, नगरसेवक महेश देवरे, उषा भामरे, साहेबराव बच्छाव, पंडित भदाणे, उज्वला जाधव, वैभव गांगुर्डे, प्रफुल्ल ठाकरे, राजेंद्र सोनवणे, विलास देवरे, आर. व्ही. देवरे, चंद्रकांत महामिने, प्रा. अनिल सोनार, नरेश महाजन, शकुंतला ततार, प्रा.कल्पना पाटील, अशोक भामरे ,डॉ. सिद्धार्थ जगताप, अनिल जाधव, एन. टी. मंजुळे, डी. डी. पाटील, दगा वाघ, आर. डी. निकम, अजय सोनवणे, प्रा. ललित खैरनार, राजू धोत्रे, संजय धोत्रे आदी उपस्थित होते.  
दरम्यान, आज सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन व तहसीलदार प्रमोद हिले यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले.

यानंतर टिळक रोडवरील मुख्य बाजारपेठेतून ग्रंथदिंडी काढण्यात आली. विविधरंगी मऱ्हाटमोळ्या पद्धतीत पारंपारिक साड्यांचा पेहराव केलेल्या विद्यार्थिनी व लेझीम खेळणारी मुले, तुताऱ्या हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com