जैताणेतील भिल्लवस्तीत 'सकाळ'चे सामूहिक वाचन

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 8 मे 2018

आदिवासी बांधवांकडून प्रा. डॉ. रिता माळचेंसह 'सकाळ'वर कौतुकाचा वर्षाव

निजामपूर-जैताणे (धुळे) : बालपणीच पितृछत्र हरपल्यानंतरही अतिशय कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत पीएच.डी. प्राप्त केलेल्या मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका व साक्री येथील भिल्ल वस्तीतील मूळ रहिवासी डॉ. रिता माळचे-सोनवणे यांच्यावरील 'भिल्ल समाजातील रिता झाली डॉक्टरेट' या वृत्ताचे जैताणे (ता.साक्री) येथील भिल्लवस्तीत सामूहिक वाचन करत आदिवासी बांधवांनी प्रा. डॉ. रिता माळचेंसह 'सकाळ'वर कौतुकाचा वर्षाव केला.

कठोर मेहनतीतून यशाची एकेक पायरी पार करत प्रा. डॉ. रिता माळचे-सोनवणे यांनी आदिवासी समाज जीवनावर मुंबई विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पीएचडी मिळवून खान्देशातील भिल्ल समाजाची पहिली महिला ठरण्याचा मान मिळविल्याबद्दल निजामपूर-जैताणेसह संपूर्ण तालुक्यात त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. दैनिक 'सकाळ'मधील प्रा. डॉ. रिता माळचे यांच्या वृत्ताचे वाचन करताना जैताणेचे सरपंच संजय खैरनार, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, सुरेखा भिल, सामाजिक कार्यकर्ते विलास देसले, आबा भिल व लहान चिमुरड्यांसह महिला, पुरुष आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच खैरनार यांनी आदिवासी बांधवांना डॉ. माळचे यांच्याप्रमाणेच शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले. आगामी काळात जैताणे ग्रामपंचायतीसह भिल्ल समाजातर्फे डॉ. माळचे यांचा सत्कार करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एकच उत्सुकता व कुतूहल दिसत होते. याप्रसंगी सकाळच्या अंकांचे मोफत वितरणही भिल्ल समाजबांधवांना करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य सुरेखा भिल यांनी 'सकाळ'चे आभार मानले.

Web Title: readings Sakal bhaitavitti in jaitane