फ्लाय सायट्रस हवाईसेवा देण्यास तयार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नाशिक - नाशिकपासून जास्तीत जास्त आठशे व कमीत कमी साडेसहाशे किलोमीटरच्या टप्प्यातील महत्त्वाच्या शहरांना फ्लाय सायट्रस कंपनी सेवा देण्यास तयार आहे. त्यासाठी कंपनीने दर व पोचण्याचा कालावधी जाहीर केला आहे. सेवा सुरू करण्यापूर्वी कंपनीला नाशिक ते मुंबई हवाईसेवेसाठी प्रवाशांची हमी द्यावी लागणार आहे. 

नाशिकहून हवाईसेवा सुरू करण्यासाठी उद्योजकांकडून सर्वेक्षण सुरू असताना "फ्लाय सायट्रस' कंपनीने सेवा देण्यास होकार दिला आहे. त्यासाठी अडीचशे प्रवाशांची हमी व महिनाभर नियमित सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या संदर्भात उद्योजकांनी कंपनीशी संपर्क साधला आहे. 15 जूनपासून कंपनीतर्फे ऑनलाइन बुकिंग सुरू होणार असून, नंतर मेक माय ट्रिप, यात्रा डॉट कॉमद्वारे बुकिंग होईल. दोन इंजिन असलेले चार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेले हे विमान आहे. सुरवातीला नाशिक ते जुहू एअरपोर्टपर्यंत दर तासाला सेवा देण्याचे नियोजन आहे. यानिमित्त मुंबईशी कनेक्‍टिव्हिटी वाढणार असल्याचे ईएसडीएस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी सांगितले. एअर टॅक्‍सीप्रमाणे सेवा राहील. 

दरपत्रक व पोचण्याचा कालावधी (ओझरपासून) 

टप्प्यातील शहर प्रवासाचा दर (रुपयांत) पोचण्याचा कालावधी (मिनिटे) 

जुहू 3,000 39 
पुणे 3,067 39 
शिर्डी 1,333 17 
सुरत 3,000 39 
दमण 2,167 28 
बडोदा 4,667 60 
अहमदाबाद 6,667 86 
भावनगर 4,667 60 
दिव 6,000 77 
आमरेली (गुजरात) 5,833 75 
इंदूर 6,333 81 
औरंगाबाद 3,000 39 
लातूर 6,000 77 
सोलापूर 6,333 81 
बारामती 4,000 51 

नाशिकपासून नियमित हवाईसेवा सुरू होणे गरजेचे आहे. नवीन सुरू होणाऱ्या सेवेला नागरिकांनी पाठिंबा दिल्यास सेवा नियमित सुरू राहील. 
- पीयूष सोमाणी, व्यवस्थापकीय संचालक, ईएसडीएस 

Web Title: Ready to fly citrus air service