गौरव गिल रॅली ऑफ ऑस्ट्रेलियासाठी सज्ज

residentional photo
residentional photo

नाशिक : भारताचा आघाडीचा रॅली ड्रायव्हर गौरव गिल एफआयएची वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिपची अंतिम फेरी रॅली ऑफ ऑस्ट्रेलियासाठी सज्ज झाला आहे. या विकेंडला ही फेरी होईल. तीन वेळचा एपीआरसी चॅम्पियन व अर्जुन पुरस्कारप्राप्त गिलने या रॅली गेल्या वर्षी सहभाग नोंदवला होता व त्यामध्ये त्याने चमक दाखवली होती.
     

रॅली ऑफ टर्कीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक

भारताचा जेके टायर अ‍ॅथलीट असलेल्या गिलने मॅकनिल ग्लेनसह सह चालक म्हणून रॅली ऑफ टर्कीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे. त्याच्या गटात अव्वल पाच जणांमध्ये येण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. त्याच्यासमोर तांत्रिक अडचणींना प्रश्‍न आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर त्याच्या अडचणीत भर घातली होती. आर 5 डब्ल्युआरसी 2 च्या शेवटच्या दिवशी 5 किमी शिल्लक असताना त्याच्य गेअरबॉक्समध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली.रॅली ऑफ वेल्सला तो मुकला आणि तो केनार्ड हायर रॅली ऑस्ट्रेलियासाठी सज्ज आहे.जी नोव्हेंबर 14 ते 17 दरम्यान होणार आहे.
 

ही रॅली मी सकारात्मक निकाल नोंदवेल, गिलचा विश्‍वास    

गेल्या काही दिवसांपासून मी येथे यशस्वी चाचणी घेत आहे. मी कारमध्ये काही बदल केले आहेत आणि नवीन कारबाबत मी समाधानी आहे. मी रॅलीसाठी उत्सुक आहे. या रॅली मी सकारात्मक निकाल नोंदवेल असा विश्‍वास न्यु साऊथ वेल्समध्ये प्रॅक्टिस रननंतर गिलने व्यक्त केला. मला भारतीय फॅन्सच्या पाठिंब्यासोबत सोशल मिडियाच्या शुभेच्छुक देखील पाठीशी असल्याचे गिल पुढे म्हणाला.
   

रॅली पूर्ण करत पहिला भारतीय बनण्याचा देखील प्रयत्न  

गौरव गिलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे जे के टायर मोटरस्पोर्ट्सचे प्रमुख संजय शर्मा म्हणाले. त्याच्याकडून आक्रमकरित्या सहभागाची अपेक्षा आहे जसे तो नेहमी करतो असे शर्मा यांनी सांगितले. गेल्या वर्षीची गौरव गिलची कामगिरी पाहता यावेळी त्याला पोडियमवर येण्याची संधी आहे. यासोबतच रॅली पूर्ण करत पहिला भारतीय बनण्याचा देखील त्याचा प्रयत्न असेल. न्यु साऊथ वेल्समधील वणवा लागल्याने रॅली ऑफ ऑस्ट्रेलियाचे काळ कमी करण्यात आला. आयोजक हे आपत्कालीन सेवा, स्थानिक संस्थांशी चर्चा करुनच याबाबत अंतिम निर्णय घेतली. डब्ल्युआरसीच्या चार दिवसांचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडेल असा विश्‍वास त्यांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com