लाल मिरचीचा ठसका सामान्यांना सोसेना!

red-chilli-powder.jpg
red-chilli-powder.jpg

नाशिक : (नरकोळ) लाल मिरचीचा भाव गेल्या वर्षीपेक्षा यंदा किलोमागे 30 ते 50 रुपयांनी वाढला आहे. लाल मिरचीचा ठसका दोनशेपार गेल्याने गृहिणींचे मसाल्याचे गणित बिघडणार आहे. असे असले तरी हिरव्या मिरचीचे दर मात्र आवाक्‍यात आहेत. 
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, आंध्र प्रदेश, कर्नाटक मिरचीच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. नंदुरबार, दोंडाईचा, विदर्भात नागभीड, आंध्र प्रदेशात गुंटूर येथे लाल मिरची घेतली जाते.

 लाल मिरचीची आवक कमी होऊन दर कडाडले

यंदा परतीच्या पावसामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने लाल मिरचीची आवक कमी होऊन दर कडाडले आहेत. शेतकरी नगदी व कमी कालावधीत येणारे पीक म्हणून विविध पिकांमध्ये मिरचीचे आंतरपीक घेण्यास प्राधान्य देतात. लाल मिरची तयार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो.

हिरवी मिरची 25 ते 30 रुपये दराने बाजारात उपलब्ध

उन्हाळा हिवाळा या दोन ऋतूंत मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. हिवाळ्याच्या मध्यापासूनच मसाल्यासाठीच्या वस्तूंची जमवाजमव सुरू होते. उन्हाळ्याच्या प्रारंभी महिला मसाला बनवितात. हिरवी मिरची मात्र 25 ते 30 रुपये दराने बाजारात उपलब्ध आहे. 

असे आहेत लाल मिरचीचे (दर - प्रतिकिलोमध्ये)

लाल मिरची प्रकार -  (मागील वर्षी - चालू वर्षी) ​
           
बेडगी     -----200 रुपये    280 रुपये 
रसगुल्ला  ----- 180 रुपये   250 रुपये 
फाफडा   ----- 140 रुपये   180 रुपये 
गंटू     ----- 120 रुपये    200 रुपये 
नंदुरबार ----- 120 रुपये    180 रुपये 
लवंगी   -----15 रुपये      200 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com