Mathadi Worker : ‘महिला माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घ्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mathadi worker demand to rehire female worker

Mathadi Worker : ‘महिला माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घ्या’

धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत माथाडी कामगार म्हणून कार्यरत महिलांना पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेससह संबंधित कामगार महिलांनी (Women) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (Rehire female mathadi workers demanded concerned women workers along with NCP to District Collector dhule news)

कृषी उत्पन्न बाजार समितीत माथाडी कामगार म्हणून कार्यरत महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे माजी आमदार अनिल गोटे यांची भेट घेतली व गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या उपासमारीसंदर्भात माहिती दिली.

याबाबत श्री. गोटे यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांना माथाडी कामगार महिलांतर्फे पत्र दिले. याबाबत महिला माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. श्री. शर्मा यांनी संबंधित माथाडी कामगार बोर्डाच्या नियमावलीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल व संबंधित नियमावली विषय माहिती अवगत करून देण्यात येईल तसेच त्यासंबंधी माजी आमदार गोटे यांच्याशीदेखील चर्चा करून योग्य मार्ग काढण्यात येईल,

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

असे आश्‍वासन दिल्याचे निवेदनकर्त्या महिलांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती नांद्रे, गायत्री साळवे, पद्मा चव्हाण, संगीता सरोदे, सिंधू शिंदे, सीता महानोर, मंगला सोनार, नर्मदा धायगुडे, कमला मोरे, गोदा थोरात, शेवंताबाई देसले, सरलाबाई तमखाने, केवलबाई महाले, विमल मराठे, सुंदराबाई देवकाते, विमलबाई बोरकर, गायत्री साळवे आदींनी मागणीचे निवेदन दिले.