घाटीत दोन निवासी डॉक्टरांना मारहाण

योगेश पायघन 
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : घाटीच्या मेडिसिन इमारतीतील वार्ड 8-9 मध्ये 46 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हलगर्जी पणाचा आरोप करीत कनिष्ठ निवासी डॉ व्यंकटेश पेंटवाड, महिला डॉ. कृणाल तांबोळी यांना मारहाण केली. ही घटना रविवारी (ता 14) रात्री साडे आठच्या सुमारास घडली. सुभाष भीमराव जाधव (वय 46, रा मिलिंद नगर, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे.

प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष जाधव यांना रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता वार्ड 8-9 मध्ये भरती करण्यात आले होते. त्यांची तब्बेत गंभीर होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना अटेंड केले. भरती करण्याचा दिवस त्याच वार्डचा असल्याने 90 रुग्ण या वार्डात भरती होते. दरम्यान साडे आठ वाजता रुग्णाला पाहण्यासाठी नातेवाईक तगादा लावत होते. तेव्हा नातेवाईकाने महिला डॉक्टरला ओढत नेले त्यावेळी हस्तक्षेप करणाऱ्या एका डॉक्टरलाही नातेवाईकांनी मारहाण केली. उपस्थीत ब्रदरने भांडण सोडवले. त्यानंतर सुरक्षा रक्षक व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजीतने वार्डात धाव घेतली. नऊच्या सुमारास डॉ भारत सोनवणे, डॉ प्रभाकर जिरवणकर पोहचून त्यांनी हस्तक्षेप करत नातेवाईकांची समजूत काढली. दरम्यान डॉक्टरला मारहाण झाली त्यामुळे विद्यार्थी व मार्डचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचल्याने एकच गर्दी झाली होती. मार्ड संघटनेने मारहाण करणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

अकराच्या सुमारास अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकिय अधीक्षक डॉ. कैलास झिने, डॉ. भारत सोनवणे, डॉ. के. सी चंडालिया, डॉ अनिल जोशी यांनी तात्काळ घाटीत मार्ड पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तक्रार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्या महिला डॉक्टरची अधिष्ठातांनी विचारपूस करून घाबरून जाऊ नकोस घाटी प्रशासन तुझ्या पाठीशी असल्याचा धीर दिला. 

निवासी डॉक्टरांनी तक्रार अधीक्षक कार्यालयाला दिली आहे. डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्ट पोलिसांत सोमवार सकाळी तक्रार करणार आहोत.

- डॉ. भारत सोनवणे, माजी वैद्यकिय अधीक्षक, घाटी रुग्णालय, औरंगाबाद

Web Title: Relatives of the patient beat two resident doctors in Ghati hospital