पालखेड कालव्याचे आवर्तन 15 नोव्हेंबरपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

येवला : येवलेकरांना दिवाळीची गोड बातमी मिळाली असून दुष्काळात आधारासाठी ज्याची प्रतीक्षा होती ते पालखेड डावा कालव्याचे पिण्याचे व सिंचनाचे पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. हे आवर्तन 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान सोडण्यात येईल तर दुसरे आवर्तन दुष्काळजन्य परिस्थिती नुसार ठरवले जाईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. वितरिका 46 ते 52 वरील बंधारे पिण्याच्या पाण्याने भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव पाठवा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जामनेर येथे बाबा डमाळे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाजन यांची भेट घेऊन आवर्तनाची मागणी केली. पालखेड कालव्यात दोन पूर्ण क्षमतेने आवर्तने द्या अशी मागणी यावेळी डमाळे यांनी केली. पालखेडच्या कट मारलेल्या पाण्याची तूट भरून काढण्याकरता नारपार वळण बंधाऱ्यातून लिफ्टद्वारे पाणी मिळण्यासाठी सर्वेसाठी सहा कोटीची तरतूद केल्याबद्दल तसेच पालखेड कालवा व चारी क्रमांक 46 ते 52 वरील बंधारे पिण्याच्या पाण्यासाठी भरून देण्याची मागणी मान्य केल्याबद्दल, जायकवाडीसाठी पालखेड- करंजवण धरणातील पाणी सोडण्याबाबत निर्णया बाबत यापूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील व महाजन यांची भेट घेऊन डमाळे यांच्या शिष्टमंडळाने जायकवाडीसाठी पाणी सोडू नये अशी प्रथम मागणी केली होती. आजच्या भेटीत सदरहू मागणी मान्य करत येवल्याच्या हक्काचे पाणी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाजन यांचे आभार मानून सत्कार या प्रसंगी शेतकरी प्रतिनिधीनी केला.

या शिष्टमंडळात उत्तर पूर्व भागातील गावातील लाभार्थी शेतकरी प्रमुख कार्यकर्त्यांसह अरुण देवरे, बाळासाहेब काळे, रामू भागवत, अमोल सोनवणे,आण्णासाहेब ढोले,जगदीश गायकवाड,गजानन देशमुख, दिलीप भागवत,भगवान सोनवणे, ठकचंद वरे,देवा भागवत,संतोष वलटे, आप्पासाहेब भागवत,संजय भागवत, बाबा शंकर सोनवणे, कपिल देशमुख, प्रकाश बजाज, शिवाजीराव ढोले,भरत बोंबले, डॉक्टर शरद काळे,अशोक थोरात, ज्ञानेश्वर वाळूज, अण्णा थोरात,नाना जगताप,अरुण शेळके,अरुण सोनवणे, भास्कराव शेळके,रवींद्र शेळके, विलास भागवत,कचरु चव्हाण,बाबासाहेब भागवत, रावसाहेब मगर,भाऊसाहेब भागवत, बाबासाहेब पवार आदिसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Web Title: release of water in Palkhed canal is from 15 November