चैत्रोत्सवासाठी चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडावे - आ. दीपिका चव्हाण

dipika-chavan
dipika-chavan

सटाणा : सप्तश्रुंगी गड (ता.कळवण) येथील आदिमायेचा चैत्रोत्सवासाठी खानदेशातून पायी येणाऱ्या भाविकांसाठी चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात आजच आवर्तनाने पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी राज्याचे जलसंपदामंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात, सप्तशृंगी मातेचा चैत्रोत्सव चैत्रोत्सव सुरू झाल्याने धुळे, नंदुरबारसह खान्देश परिसरातून लाखो भाविक पदयात्रेने सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. अत्यंत कडक उन्हामुळे गिरणा नदी पात्रातील पाणी आटले आहे. त्यामुळे मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण परिसरामध्ये तीव्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा करावी लागत आहे. गडावर धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातील लाखो भाविक पदयात्रेने सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.

दरवर्षी गिरणा नदीपात्रात पाणी असल्यामुळे या भाविकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत नव्हता. सर्व भाविक मनमुरादपणे गिरणा नदीपात्रात पाण्याचा आनंद लुटत असत. सद्या ऐन यात्रोत्सवात गिरणा नदीपात्र कोरडे झाल्यामुळे खान्देशातून पदयात्रेने येणाऱ्या भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या  १० एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे नियोजन जाहीर केले आहे. अत्यंत कडक उन्हामुळे गिरणा नदीपात्राच्या दुतर्फा असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींचा स्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना सध्या बंद स्थितीत आहेत. सटाणा शहराला तर चार दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन जाहीर झाले आहे. तसेच सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी पदयात्रेने येणाऱ्या भाविकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत.

चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात १४ दिवस आगोदर आवर्तनाने पाणी सोडावे त्यामुळे भाविकांची आजची गरज भागुन पुढील आवर्तनावरहि त्याचा फारसा फरक पडणार नाही. या एकूणच टंचाई परिस्थितीचा विचार करून शासनाने चणकापूर धरणाचे आवर्तन आजच सोडून चैत्रोत्सवासाठी येणाऱ्या धुळे, जळगाव, नंदुरबारसह खान्देशातून येणाऱ्या भाविकांना दिलासा द्यावा. अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com