निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन 11 वर्षानंतर अदा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

सटाणा : गेल्या 11 वर्षांपासून थकीत असलेले येथील पालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन व सहाव्या वेतन आयोगाचा फरक अशी एकूण 77 लाख 5 हजार रुपयांची थकबाकी काल (ता.3) अदा करून नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पालिकेला थकबाकी मुक्त केले.

सटाणा : गेल्या 11 वर्षांपासून थकीत असलेले येथील पालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन व सहाव्या वेतन आयोगाचा फरक अशी एकूण 77 लाख 5 हजार रुपयांची थकबाकी काल (ता.3) अदा करून नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पालिकेला थकबाकी मुक्त केले.

पालिका सभागृहात आज आयोजित विशेष कार्यक्रमात पालिकेचे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष मोरे यांच्या हस्ते धनादेश देऊन थकीत वेतन व फरक अदा करण्यात आला. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सहावा वेतन आयोगाचा फरक 11 लाख 36 हजार 314 रुपये, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सहाव्या वेतन आयोगाचा फरक 23 लाख 79 हजार 987 रुपये तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित देणे 42  लाख 29 हजार 144 रुपये असे एकूण 77 लाख 5 हजार रुपये गेल्या अकरा वर्षांपासून पालिकेकडे थकीत होते. 

या थकीत रक्कमेबाबत पालिका सिटू संलग्न कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस पोपटराव सोनवणे, निवृत्त कर्मचारी व पालिकेतील काँग्रेसचे विद्यमान गटनेते दिनकर सोनवणे, सुभाष सोनवणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाकडे मागणी केली होती. नगराध्यक्ष मोरे यांनी य मागणीची दखल घेत आज एका विशेष कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा केले. 

यावेळी उपनगराध्यक्ष संगीता देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नितीन सोनवणे, काँग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, राहुल पाटील, नगरसेविका पुष्पा सूर्यवंशी, डॉ. विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव, सुनीता मोरकर, बाळू बागुल, शमा मन्सूरी, शमीम मुल्ला, कामगार संघटनेचे पोपटराव सोनवणे, सुभाष पाटील, हिरामण सोनवणे, संजय सोनवणे, किशोर सोनवणे आदींसह सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

शहराच्या विकासात पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या हक्काचे देणे थकीत राहू नये यासाठी यापुढील काळात त्या - त्या वर्षी कर्मचाऱ्यांचे देणे अदा करण्याबाबत विशेष दक्षता घेतली जाईल. 

- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सनपा

Web Title: remaining salary due after 11 years to pensioners