मृत्यूमुखी पडलेल्या भावाच्या विधवेशी दिराचा विवाह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नांदगाव : वर्षभरापूर्वी वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या भावाच्या विधवेशी धाकट्या दिराचा विवाह आज पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. विशेष म्हणजे विवाहासाठी तिच्या सासरच्या मंडळींनी पुढाकार घेतला.

नांदगाव : वर्षभरापूर्वी वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या भावाच्या विधवेशी धाकट्या दिराचा विवाह आज पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. विशेष म्हणजे विवाहासाठी तिच्या सासरच्या मंडळींनी पुढाकार घेतला.

बंजारा समाजातील झालेल्या आज झालेल्या या पुनर्विवाहाची तालुक्यात चर्चा होती. गेल्या वर्षी जूनला पोही येथील आपल्या शेतात मक्याच्या लागवडीसाठी रामदास व अरुण हे दोघे भाऊ काम करीत असताना वादळ वाऱ्यासह आलेला पाऊस व पावासोबत विजेचा लोळ त्यांच्या दिशेने झेपावला. रामदासाला वीज चाटून गेल्याने तो गतप्राण झाला. मात्र अरुण या घटनेत थोडक्यात बचावला होता. या घटनेमुळे प्रामुख्याने ऊसतोडणीसाठी ओळखले जाणारे कामगारांचे व लमाण बंजारा समाजाचे गाव म्हणजे पोही. अशा या गावात त्यातही लमाण बंजारा समाजात एखाद्या विधवेचा पुर्नविवाह तशी दुर्मिळ घटना.

वर्षभरापूर्वी अकाली निघून गेलेल्या रामदासाच्या पत्नी सुरेखाच्या उर्वरित आयुष्याचे काय ऊसतोडणी शिवाय अन्य पर्याय नसल्याने विधवा सुनेच्या भवितव्याच्या प्रश्नाने चिंताग्रस्त बनलेल्या सासऱ्याने पोपट राठोड यांनी अविवाहित असलेला लहान मुलगा अरुणला आपल्या मनातील खंत सांगितली. त्याने होकार दिला, मग सुरेखाच्या माहेरच्या मंडळींचे मन तयार केले. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली व आज अखेर दुपारी माणिकपुंज धरणाच्या क्षेत्रात असलेल्या पुरातन बेलेश्वर महादेव मंदिराच्या मंडपात हा पुर्नविवाह शिवसेनेचे नेते विष्णू निकम तालुका पंचायत समितीच्या सभापती सुमनताई निकम गटविकास अधिकारी जगनराव सूर्यवंशी यांच्यासह कसाबखेडा, कासारी माणिकपुंज आदी भागातील लमाण बंजारा समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

Web Title: remarriage of widow with her brother in law