शिरपूरमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याने खळबळ; रुग्णांचे हाल

केंद्राचे शटर बंद असून त्यावर गुजराथ सरकारने प्रतिबंध लावल्यामुळे आता आमच्याकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध राहणार नाहीत
शिरपूरमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याने खळबळ; रुग्णांचे हाल

शिरपूर : तालुक्यात रेमडेसिव्हिरची विक्री करणाऱ्या एकमेव आर.सी.पटेल जेनेरिक मेडिकल स्टोअर्सवर बुधवारी (ता.१४) सकाळी इंजेक्शनची विक्री थांबवल्याची सूचना लावल्याचे पाहून खरेदीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातलगांना हात हलवीत माघारी जावे लागले. दिवसभरात जिल्हाधिकाऱ्यांकडून शहरातील कोविड उपचार केंद्रांना ४० रेमडेसिव्हिर उपलब्ध करुन दिल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र एकूण रुग्णसंख्या लक्षात घेता मागणी व पुरवठ्यातील तफावत मोठी असल्यामुळे गंभीर रुग्णांची स्थिती अतिगंभीर होण्याची शक्यता आहे.

कोविड संसर्गावर उपचारात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची उपयुक्तता मोठी मानली जाते. त्यामुळे रुग्णांवर त्याचा मुक्त वापर सुरु आहे. रेमडेसिव्हिर उत्पादक कंपन्यांपैकी किंमतीच्या तुलनेत गुजराथ येथील कॅडिला हेल्थकेअरद्वारे निर्मित रेमडॅक या रेमडेसिव्हिरची किंमत कमी आहे. येथील आमदार अमरीशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी आर. सी. पटेल जेनेरिक मेडिकल स्टोअर्समार्फत प्रत्येकी ७७५ रुपये अशा अल्पदरात रेमडेसिव्हिर उपलब्ध करुन दिले. चार एप्रिलपासून तेथे विक्री सुरु होती. शिरपूरसह जिल्हाभरातील रुग्णांचे नातलग तेथून रेमडेसिव्हिर मिळवत होते.

केंद्राचे शटर बंद

बुधवारी (ता.१४) सकाळी रांग लावण्यासाठी गेलेल्यांना मात्र केंद्राचे शटर बंद असून त्यावर गुजराथ सरकारने प्रतिबंध लावल्यामुळे आता आमच्याकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी असा फलक चिकटवलेला आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्ण, नवे रुग्ण यांना रेमडेसिव्हिर मिळणार नसतील तर उपचार कसे होतील या प्रश्‍नामुळे नातलगांसह डॉक्टर्सही चिंतेत बुडाले. नेमका काय प्रकार घडला याविषयी कोणाकडूनही माहिती मिळत नव्हती.

प्रशासन करणार पुरवठा

अखेर नवे रुग्ण दाखल करुन घेण्याची प्रक्रिया बऱ्याच कोविड सेंटरने काही तासांपुरती स्थगित केली. रेमडेसिव्हिरचा साठा यापुढे मेडिकल स्टोअर्सऐवजी थेट कोविड सेंटर्सला उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे दुपारी प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर शहरातील चार उपचार केंद्रांनी मागणी केलेल्या ५२ पैकी ४० रेमडेसिव्हिरचा पुरवठा केला. मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत नव्या रुग्णांसाठी रेमडेसिव्हिरची गरज भासल्यास काय हा प्रश्न

मागणी आणि मिळालेली संख्या 

बुधवारी शिरपूरच्या कोविड सेंटरनिहाय मिळालेल्या रेमडेसिव्हिरची संख्या, कंसात मागणी केलेल्या इंजेक्शनची संख्या अशी : लाइफलाइन हॉस्पिटल १० (१२), श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल १० (१०), धन्वंतरी हॉस्पिटल १० (१०), जंबो कोविड सेंटर १० (२०)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com