शाळा सोडतांना वर्गात पुजला गेला सहकारी मित्राचा फोटो!

संतोष विंचू
सोमवार, 23 एप्रिल 2018

येवला : सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजे नक्कीच विशेष नाही..बातमीचा तर अजिबात विषय नाही.पण या कोवळ्या वर्गातील चिमुकल्यांनी आपल्या गमावलेल्या सहकाऱ्याच्या प्रती दाखवलेली सुदाम्याची भावना मात्र एखाद्या परिपक्व माणसाला लाजवेल अशीच आहे.शाळा सोडतांना या चिमुकल्यांनी याच शाळेतील तीन वर्षापूर्वी या जगातून निरोप घेतलेल्या मित्राचा फोटो सरस्वतीच्या फोटोशेजारी या कार्यक्रमात ठेऊन हळहळ व्यक्त करत मैत्रीच्या नात्याचा अनोखा संदेश दिला आहे.

येवला : सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजे नक्कीच विशेष नाही..बातमीचा तर अजिबात विषय नाही.पण या कोवळ्या वर्गातील चिमुकल्यांनी आपल्या गमावलेल्या सहकाऱ्याच्या प्रती दाखवलेली सुदाम्याची भावना मात्र एखाद्या परिपक्व माणसाला लाजवेल अशीच आहे.शाळा सोडतांना या चिमुकल्यांनी याच शाळेतील तीन वर्षापूर्वी या जगातून निरोप घेतलेल्या मित्राचा फोटो सरस्वतीच्या फोटोशेजारी या कार्यक्रमात ठेऊन हळहळ व्यक्त करत मैत्रीच्या नात्याचा अनोखा संदेश दिला आहे.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील एका वेगळ्याच नात्याची झलक सायगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहायला मिळाली.परीक्षा सुरु झाली,संपत आली आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची घालमेल सुरु झाली आणि दरवर्षीप्रमाने निरोपसमारंभाचा दिवस उजाडला सर्व तयारी मुलांनीच केली. जेंव्हा सातवीच्या वर्गात शिक्षक गेले अन समोर चित्र पाहिले असता त्यांचे शब्द गोठून गेले.या वर्गात दोन प्रतिमा ठेवलेल्या होत्या.एक सरस्वतीमातेची तर दुसरी त्याच वर्गात तिन वर्षापुर्वी शिकणार्या स्व.प्रथमेश कोथमिरे या माजी विद्यार्थ्याची..ज्याने तीन वर्षापुर्वीच जगाचा निरोप घेतला होता.मुलांचे मनं किती हळवे व निरागस असतात याचा प्रत्यय या घटनेने आला. तिन वर्षापुर्वी सोडुन गेलेल्या सहकारयाचे स्मरण करत आज तो असता तर त्यानेही या निरोप समारंभात हिरीरीने भाग घेतला असता..या कल्पनेनेच सर्व विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते.

एक दोन विद्यार्थीनींनी सुरुवात केली. प्रास्ताविक झाले आणि सुरु झाले त्यांचे अनुभव..पहिली पासुनचा त्यांचा प्रवास त्यांच्याच शब्दात आणि आपसुकच संपुर्ण वर्गाचा बांध फुटला वर्गशिक्षक व्ही.एन.जोंधळे सरांचा हात खिशात गेला. काही विद्यार्थीनींनी स्वताला सावरत आपले मनोगत व्यक्त करत होत्या डोळ्यात अश्रु....अधुनमधुन येणारे हुंदके...निश्चयाने थोपवत या शाळेविषयी तसेच जोंधळे,घोलप,रेड्डी,गजानन देवकाते या शिक्षकांप्रती कृतज्ञ्नता व्यक्त करत होत्या अधुनमधुन सर्व स्टाफचे आभार मानत होत्या मुख्या.च्या मार्गदर्शनाची आठवण सांगत होत्या. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यतिरीक्तही आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत हे समजावलं आणि या सात वर्षात मिळालेल्या शिदोरीचा उपयोग सकारात्मक व विधायक कार्यासाठी करण्याचा संदेश दिला.

गुणी मित्राला कसे विसरणार...
प्रथमेश रमेश कोथमिरे..हा सायगाव शाळेतील अतिशय हुशार व चाणाक्ष मुलगा होता.इयत्ता चौथीत असताना ईदच्या   सुट्टीच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यावर कपडे घालताना पॅन्टमध्ये विंचू चावल्याचे निमित्त झाले.घरच्यांनी उपचारासाठी अंदरसुलला नेले.तिथून येवला,कोपरगाव नंतर नाशिकला नेले.पण काही उपयोग झाला नाही,प्रथमेशची प्राणज्योत मावळली.पण प्रथमेश सहकारी त्याला अजूनही विसरायला तयार नाहीत,प्रत्येक सण,समारंभात प्रथमेशची आठवण काढतातच,कारण प्रथमेश होताच तसा गुणी..!

Web Title: remembering expired friend by 7th standard students