अपारंपरिक स्रोताद्वारे वीजनिर्मिती प्रकल्पाची दखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

एकलहरे - येथील मातोश्री आसराबाई पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांचे अपारंपरिक स्रोतातून वीजनिर्मितीच्या मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व शिक्षणमंत्र्यांनी घोषित केलेल्या पायलट प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसत असून, ऊर्जा व महाऊर्जा (मेडा) खात्याच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयास भेट देऊन प्राचार्य व संबंधित विद्यार्थ्यांशी नुकतीच चर्चा केली. 

जितेंद्र शेवाळे, संदीप गुप्ता, चेतन ठाकरे, प्रणव केदारे, संकेत सोमवंशी व संतोष जगताप या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी आरशाची काच, डिश व स्टीम इंजिनच्या सहाय्याने सूर्यप्रकाशावर वीजनिर्मिती प्रकल्पाचे मॉडेल तयार केले होते. या प्रकल्पातून १२ हजार ३५० वॉट वीजनिर्मिती शक्‍य होऊ शकते. या प्रकल्पाचे सादरीकरण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमोर केले होते. तेव्हा हा पायलट प्रकल्प म्हणून निवडण्यात आला होता. 

या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी महाऊर्जाचे विभागीय अधिकारी विशाल शिवतारे, व्ही. बी. उगले आदींनी प्राचार्य संजय बागूल, विद्युत शाखेचे विभागप्रमुख प्रा. मयूर गायधनी व संबंधित विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली. प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्त्वावर निधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे या अधिकाऱ्यांनी चर्चेत सांगितले. हा निधी मिळविताना प्रकल्पासंदर्भातील पूर्ततेसंबंधी श्री. शिवतारे यांनी माहिती दिली. 

विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचे मॉडेल बनविताना महाविद्यालयाच्या प्राचार्य, शिक्षकांसह गौतम कंबोज, गजेंद्र पुराणिक, संकेत नंदन यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Web Title: Renewable source power generation project intervention