नाशिक - नामपूर येथील ग्रामदैवत शनीमंदिराचे रूप पालटले

प्रशांत बैरागी 
सोमवार, 28 मे 2018

नामपूर (नाशिक) : येथील जागृत देवस्थान असलेल्या शनैश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती यतिंन्द्र पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून सुमारे पाच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मंदिराचे रूप पालटले आहे. 

नामपूर (नाशिक) : येथील जागृत देवस्थान असलेल्या शनैश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती यतिंन्द्र पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून सुमारे पाच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मंदिराचे रूप पालटले आहे. 

शहरात अनेक देवदेवतांची मंदिरे असून लोकसहभाग व शासनाच्या योजनांच्या माध्यमातून मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. शनीमंदिराच्या विकासासाठी शिक्षण सभापती यतिंन्द्र पाटील यांना शनैश्वर मित्रमंडळ व ग्रामपंचायत प्रशासन यांनी साकडे घातले होते. शिक्षण सभापती झाल्यानंतर यतिंन्द्र पाटील यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याने चार महिन्यात मंदिराच्या सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे. शनैश्वर महाराज मित्र मंडळाच्या वतीने सभापती यतींद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन सभापती यतिंन्द्र पाटील यांनी शनैश्वर मित्रमंडळ यांना दिले असून मंदिरासमोरील जागेवर नामपूरचे जिल्हा परीषद सदस्य कन्हु गायकवाड यांच्या निधीतून सभागृह बांधण्यात येणार आहे. 

शनी मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त शनैश्वर महाराज तरुण मित्रमंडळातर्फे कीर्तन महोत्सव ही आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात आली होती. मोसम खोऱ्यातील ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या पाच दिवसात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन कारांच्या कीर्तनाने मोक्षगंगा तीर मंत्रमुग्ध झाला.वारकरी संप्रदायाच्या यशोदा अाक्का, तुकाराम बाबा गोराणकर कीर्तनकेशरी ह. भ. प. संजय नाना धोंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कीर्तन सोहळा आनंद चौकातील शनैश्वर महाराज मंदिर परिसरात उत्साहात झाला.  

कीर्तन सोहळ्यात मृदूंगाचार्य ह. भ. प. गंभीर महाराज अवचार, गायनाचार्य ह. भ. प. किशोर महाराज दिवटे, ह. भ. प. नारायण महाराज खिल्लारी, ह. भ. प. दिनानाथ महाराज सावंत व ह. भ. प. रविंद्र महाराज यांची सुरेल साथ लाभली. मोक्षगंगा तीरावरील आनंद चौकात होणारा गणेश उत्सव, नवरात्र उत्सव आणि आता झालेल्या कीर्तन महोत्सवाने एक नावलौकिक मिळवला आहे. गावाची वसाहत गावाच्या दक्षिणेला वाढत गेल्याने मोक्षगंगा तीर ओस पडला होता. परंतु, अशा उत्सवांच्या माध्यमातून या परिसराला आता पुनर्वैभव प्राप्त झाले असून, तरुणांच्या माध्यमातून भक्ति आणि शक्तीचा अनोखा संगम नामपूरकरांना अनुभवायला मिळाला.

तुळजाई ग्रुपचे जगदीश सावंत, निलेश सावंत, महेश सावंत, उदय पगारे, दिलीप सावंत, योगेश गायकवाड, योगेश अहिरे, हेमंत पगारे, संजय पगारे, विनोद खैरनार, दिगंबर सोनवणे, विजय अहिरे, पप्पू जाधव, किरण सावंत, दिनेश पाटील, पप्पू मैंद, रोशन मोरे, मनिष सावंत, जयेश सावंत, विकिराज सावंत, सागर कंकरेज, सुरेंद्र वाघ, बापू सहजगूरू, भूषण सावंत, रामकृष्ण सावंत, सागर सावंत, राकेश पाटील, शशिकांत बच्छाव, दिपक बच्छाव आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: renovation of shani temple in nampur in nashik