केळी उत्पादकांचे प्रश्‍न खुंटीवरच

चिनावल परिसरातील केळीच्या बागा.
चिनावल परिसरातील केळीच्या बागा.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात केळी उत्पादकांचा प्रश्न उमेदवारांनी खुंटीवर टांगला आहे. पाण्यासह इतर सुविधा नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. केळी निर्यातीसाठी कार्गो वॅगन स्वप्नच ठरले आहे.

केळी उत्पादनात अग्रेसर असलेला जळगावमधील केळी उत्पादक आता हतबल झाला आहे. निर्यातीचा दर्जा असलेली केळी पिकवताना ते मेटाकुटीस येत आहेत. केळी पिकविण्यासाठी मुबलक पाणी नाही, पाण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यातील झालेल्या करारानुसार योजना कार्यान्वित नाही. केळी निर्यातीसाठी आवश्‍यक कार्गो वॅगन हे तर स्वप्नच ठरले आहे. अशा अनेक प्रश्नांत केळी उत्पादक गुरफटला आहे. किमान या लोकसभा निवडणुकीतही हा प्रश्न ऐरणीवर यावा एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे.

जळगाव म्हटलं की केळी समोर येतात. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात चिनावल हे एक गाव आहे. या परिसराला जळगावचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते. या भागात फिरताना जिकडे तिकडे चोहीकडे केळी केळीच दिसत होती. चिनावल गावात आमची गाडी थांबली. शाळेच्या परिसरात आम्ही केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. थेट केळीच्या बनात जाऊन वस्तुस्थिती पहिली. जर पाऊस चांगला झाला नाही, तर पुढील वर्षी केळीचे पीक घेणे मुश्‍कील होणार असल्याचे सांगण्यात आले. निर्यातीसाठी आवश्‍यक दर्जा येथील केळीमध्ये आहे. मात्र आवश्‍यक पाणी आणि इतर सुविधा नसल्याने आज या केळी निर्यात करण्यावर मर्यादा येत आहेत. केळीचे पीक सोडून इतर पिके घेण्याकडे शेतकरी वळत आहेत. शेतकऱ्यांसाठीचा अजेंडाच राजकीय नेत्यांकडे नसल्याची खंतही येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com