पहिल्या नंबरचे नंदुरबार विकासात शेवट

लुमाकांत नलवडे
शनिवार, 20 एप्रिल 2019

राज्यातील पहिल्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ ‘नंदुरबार’, राज्यातील पहिला मतदारही नंदुरबारचाच. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पहिली सभा झाली याच जिल्ह्यातील खांडबारा येथे. गुजरात आणि महाराष्ट्र यांची सीमारेषा येथील नवापूर या रेल्वेस्टेशनवर आहे. अशा अनेकबाबतीत महत्त्वाचे असलेले नंदुरबार ‘रोजगार अन्‌ विकासात’ मात्र शेवट आहे. शासनाच्या सर्वेक्षणातही याला दुजोरा दिलेला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग आदिवासी आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ राखीव आहे. येथे विद्यमान खासदार डॉक्‍टर हीना गावित आणि ॲड. के. सी. पाडवी यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

खांडबारा हे एक शहर रेल्वेस्थानकामुळे प्रसिद्ध आहे. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांची जाहीर सभा येथे झाली होती. आणीबाणीनंतरची ती पहिली सभा असल्याचे येथे सांगण्यात आले. ही सभा केवळ देशभरच नव्हे, तर विदेशातही चर्चेत आली. या नंदुरबारमधील आदिवासींचा विकास त्यांना करायचा होता. त्यामुळे गांधी घराणे नंदुरबारशी घट्ट जोडले गेले. त्यामुळेच इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या सर्वांनी महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ याच नंदुरबार जिल्ह्यात सभा घेऊन केला. तब्बल नऊ वेळा खासदार झालेले माणिकराव गावित याच मतदारसंघातील. नवापूर रेल्वेस्थानकावर एक पांढरी रेषा आहे. ‘त्या रेषेच्या डाव्या बाजूला महाराष्ट्र आणि उजव्या बाजूला गुजरात’ असे म्हटले आहे.

तरीही, दोन्ही बाजूंच्या विकासात खूप अंतर आहे. नवापूरमध्ये साधारण १३२ उद्योगांची औद्योगिक वसाहत आहे. तरीही, नवापूर आणि खांडबारा येथील ग्रामस्थ-नागरिक दिवाळीपूर्वी गुजरातमध्ये सुरतला कामासाठी जातात. नवापूरमध्ये मोठे टेक्‍स्टाइल हब होऊ शकते. मात्र, ते अद्यापही प्रतीक्षेतच आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. मात्र, याच सीमारेषेवर दारूचा महापूर असल्याचे सांगण्यात आले. खांडबारामध्ये उमेदवार आमदार के. सी. पाडवी यांच्याशी बोललो तेव्हा, ‘एकच ध्यास आदिवासी विकास’ असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पहिल्या क्रमांकावर असलेले नंदुरबार विकासात मात्र शेवट असल्याचे दिसून आले.

Web Title: Reporter Diary Lumakant Nalawade Nandurbar Development Issue