तापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पंचायत समिती सभापती रंजना नाईक, गटविकास अधिकारी अशोक पटेल, नायब तहसिलदार गोकूळ पाटील, माजी सभापती व्यंकट पाटील, भाजपाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष रवींद्र गिरासे, प्रकाश चौधरी, रघुनाथ पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक गवते आदी उपस्थित होते.
 
'सप्टेंबर महिन्यात दुष्काळाची झळ बसलेले राज्यातील जिल्हे व तालुके जाहीर झाले आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा या चार तालुक्यांचा दुष्काळी म्हणून समावेश आहे. त्यामुळे काल झालेल्या बैठकीत नंदुरबार तालुक्यातील 153 पैकी पूर्व भागातील 80 गावांमधील पाणी टंचाईची स्थिती आढावा बैठकीत जाणून घेण्यात आली. या बैठकीत पूर्वभागातील अनेक गावे पाणी टंचाईचा सामना करत असल्याचे समोर आले आहे. तापी नदीच्या काठी असतांनाही या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

डॉ. गावित यांनी गावनिहाय पाणी टंचाईचा आढावा जाणून घेत संबंधित अधिकार्‍यांना टंचाई निवारणासाठी उपाययोजनेच्या सूचना देण्यात आल्या. अनेक गावांमध्ये विहीर अधिग्रहण करुन देखील पाणी नसल्याने अन्य शेतकर्‍यांच्या शेतातून पाणी घेवून गावाला पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे उपस्थित सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांनी यावेळी सांगितले. तर काही गावांमध्ये केवळ पिण्यासाठी एकदिवसाआड पाणी मिळत असून गुरांसाठी तर पाणीच नाही. त्यामुळे गुरांना शेतांमध्ये घेवून जावून पाणी पाजवावे लागत आहे, अशा प्रकारे गावांमधील पाणी टंचाईची स्थिती या बैठकीतून मांडण्यात आली.

Web Title: Resolve the water dispute of villages on Tapi edge: MLA Dr. Gavit