नाशिक विभागाचा शालान्त पुरवणी परीक्षेचा निकाल 29.35 टक्के 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नाशिक : जुलै-ऑगस्ट 2018 माध्यमिक शालांत परीक्षेच्या (दहावी) जाहीर झालेल्या निकालात नाशिक विभागाचा निकाल 29.35 टक्के लागला आहे. तर राज्याचा निकाल 23.66 टक्के जाहीर झाला. यंदा नाशिक विभाग राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे. साडेबारा हजार विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 736 विद्यार्थी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 

नाशिक : जुलै-ऑगस्ट 2018 माध्यमिक शालांत परीक्षेच्या (दहावी) जाहीर झालेल्या निकालात नाशिक विभागाचा निकाल 29.35 टक्के लागला आहे. तर राज्याचा निकाल 23.66 टक्के जाहीर झाला. यंदा नाशिक विभाग राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे. साडेबारा हजार विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 736 विद्यार्थी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या जुलै-ऑगस्ट महिन्यात दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार या चार जिल्ह्÷यातील 37 परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली. त्यासाठी विभागातून 12 हजार 834 विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती. तर, प्रत्यक्षात 12 हजार 791 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते. यापैकी 3 हजार 736 विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागाचा निकाल 29.35 टक्के जाहीर झाला आहे. 

तर, राज्याचा निकाल 23.66 टक्के जाहीर झाला आहे. यात औरंगाबाद विभाग अव्वलस्थानी असून 32.83 टक्के, अमरावती विभाग द्वितीय (31.77) तर तिसऱ्यास्थानी नाशिक विभाग आहे. सर्वात निच्चांकी निकाल मुंबई विभागाचा 14.21 टक्के जाहीर झाला आहे. राज्यातून पुरवणी परीक्षेसाठी 1 लाख 22 हजार 17 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असता, 1 लाख 21 हजार 059 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, त्यापैकी फक्त 28 हजार 645 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

गुणपडताळणीसाठीची मुदत 
ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची आहे, त्यांनी 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर यादरम्यान मंडळाच्या www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर जाऊन विहित शुल्कासह अर्ज करावा. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत, गुणपत्रिकेची छायाकिंत प्रत जोडावी. तसेच, उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठीही याच संकेतस्थळावर विहित नमुन्यातील शुल्कासह 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या दरम्यान मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जाचा नमुना या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

राज्याचा निकाल 
पुणे : 23.73 टक्के 
नागपूर : 27.14 टक्के 
औरंगाबाद : 32.86 टक्के 
मुंबई : 14.21 टकके 
कोल्हापूर : 17.12 टक्के 
अमरावती : 31.77 टक्के 
नाशिक : 29.35 टक्‍के 
लातूर : 28.50 टक्के 
कोकण : 18.12 टक्के 
एकूण : 23.66 टक्के 

नाशिक विभागाच्या टक्‍क्‍यात किंचित घट 
शालांत पुरवणी परीक्षेमध्ये नाशिक विभागाचा 2015 मध्ये 25.49 टक्के, 2016 मध्ये 3190, तर 2017 मध्ये 29.46 टक्के निकाल लागला होता. यंदा त्यात किंचित घट असली तरी राज्याच्या क्रमवारीत नाशिक विभाग तिसऱ्या स्थानावर आहे.

Web Title: result of nashik division is 29.35 percent