निवृत्त अभियंता पगारला लाचप्रकरणी धुळ्यात अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

धुळे - ठेकेदाराकडे बिल मंजुरीपोटी बारा हजार रुपयांची मागणी केल्या प्रकरणी येथील महापालिकेचा कार्यकारी अभियंता अनिल पगार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज अटक केली. या प्रकरणी 30 जानेवारीला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे त्या दिवशीच पगार निवृत्त झाला होता. 

महापालिका क्षेत्रातील एका बांधकाम ठेकेदाराने वैभवनगरमधील संरक्षक भिंतीचे काम घेतले होते. त्याने काम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजुरीसाठी फाइल महापालिकेत दिली. त्यावर स्वाक्षरी करून पुढे मंजुरीस पाठविण्यासाठी बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता पगारने ठेकेदाराकडे बारा हजार रुपयांची मागणी केली. त्याने दहा जानेवारीला मोबाईलवर संपर्क साधून पैशांची मागणी केल्याचे तपास यंत्रणेला प्राप्त संभाषणावरून स्पष्ट झाले. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. शहानिशा करून उपअधीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून अभियंता पगार फरार झाला होता. त्याचा धुळे व नाशिक जिल्ह्यात शोध सुरू होता. पगार धुळ्यात आल्याची माहिती आज संबंधितांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पगारला अटक केली. उपअधीक्षक गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील हवालदार जितेंद्र परदेशी, किरण साळी, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, कैलास शिरसाट, प्रशांत चौधरी, संदीप कदम यांनी ही कारवाई केली. 

Web Title: Retired engineer arrested in bribery case Dhule