अप्पर जिल्हाधिकारी बगाटेंनी घेतला अध्यक्ष निवडणूक तयारीचा आढावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नाशिक - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या (ता. 21) सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे. निवडणूक प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांनी आज सायंकाळी जिल्हा परिषदेत येऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया नवीन इमारतीमधील रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. बगाटे यांनी सायंकाळी या सभागृहाची पाहणी केली. त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ आदी उपस्थित होते. बगाटे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणाची पाहणी करून कर्मचारी, सदस्य, मतदान कर्मचारी यांच्या प्रवेशाबाबत सूचना दिल्या. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा 

परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार केवळ अधिकाऱ्यांसाठीच खुले राहणार असून, दुसऱ्या प्रवेशद्वाराने सदस्य व कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेसमोरील रस्ता सकाळी अकरापासून निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत बंद करण्याच्या सूचना त्यांनी श्री. भुजबळ यांना दिल्या. 

अशी आहे निवडणूक प्रक्रिया 
उमेदवारी अर्ज दाखल करणे : सकाळी अकरा ते दुपारी एक 
सदस्यांची हजेरी : दुपारी एक ते सव्वा 
अर्ज छाननी : दुपारी सव्वा ते दीड 
अर्ज माघारी : दुपारी दीड ते पावणेदोन 
मतदानप्रक्रिया : दुपारी पावणेदोन ते दोन 

Web Title: A review of election preparation