बंदुकीच्या धाकाने पळवला मद्याचा ट्रक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नाशिक - दीव-दमण येथून लाखो रुपयांचा मद्यसाठा ट्रकमध्ये भरून नाशिकमार्गे गुजरातकडे जाताना चांदवड शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तो पकडला. मद्यसाठ्यासह ट्रक नाशिककडे घेऊन येताना मोटारीमधून आलेल्या संशयितांनी बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्याच्या ताब्यातून ट्रक पळविला. या घटनेची माहिती मिळताच भरारी पथकाने पाठलाग करीत पिंपळगाव बसवंत परिसरात हा ट्रक पुन्हा पकडला. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी अवैध मद्यसाठ्यासह ट्रक असा 66 लाखांचा मुद्देमाल व चौघांना अटक केली.
Web Title: Revolver Wine Truck Theft Crime