शुल्कवाढीविरुद्ध ऑटो रिक्षांचा ‘बंद’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

जळगाव - केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने वाहतूकविषयक सर्व वाहनांच्या विविध शुल्कवाढीचा निर्णय रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी आज प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेच्या कृती समितीने रिक्षासह मालवाहू वाहने चोवीस तासांसाठी बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी असंख्य रिक्षाचालक, विविध मालवाहू वाहनांचे चालक एकत्र आले होते. येत्या चार दिवसांत शुल्कवाढ मागे न घेतल्यास एक लाख वाहनचालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, पप्पूशेठ बग्गा, रज्जाक खान, मुकेश बेदमुथा, चंदू शर्मा, राधेश्‍याम व्यास, संजय पाटील, विनोद कुमावत, राजू पाटील, प्रल्हाद सोनवणे, पोपट ढोबळे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. भारत मुक्‍ती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी सांगितले, की वाहनविषयक विविध शुल्कात तीन ते पाचपट केलेली वाढ अन्यायकारक आहे. सर्वच वाहनचालकांना याचा फटका बसणार असून, बेसुमार शुल्कवाढीमुळे जीवन जगणे कठीण होणार आहे. यामुळे ही शुल्कवाढ तातडीने शासनाने मागे घ्यावी, अन्यथा एक लाख वाहनचालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनीही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी शुल्कवाढ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

आंदोलकांनी आमदार सुरेश भोळे यांनाही निवेदन दिले. आमदार भोळे यांनी निवेदन स्वीकारून शुल्कवाढ रद्द करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविली जाईल. सोबतच ज्या कोणत्याही अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावयाची असल्यास त्याबाबत मी पुढाकार घेईल. लोकप्रतिनिधी शासन व प्रशासन यांच्यातील दुवा असतो. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत योग्य तो पाठपुरवठा करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.

Web Title: rickshaw ban for fee increase