विधीच्या दीड हजार जागा राहणार रिक्‍त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नाशिक - राज्यात अभियांत्रिकीपाठोपाठ विधी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहणार आहेत. पाच वर्षे एल.एल.बी.च्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र 113 महाविद्यालयांमध्ये उपलब्ध 9 हजार 480 जागांच्या तुलनेत अर्ज कमी असल्याने यंदा दीड हजारापर्यंत जागा रिक्‍त राहण्याची चिन्हे दिसताहेत.

विद्यापीठांकडून दोन वर्षांपूर्वी विधी अभ्यासक्रमाच्या पाच आणि तीन वर्षे पदवीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्‍चित करून महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत होती. गेल्या वर्षापासून राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षा घेऊन केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकात झालेल्या विलंबामुळे अध्यापन-अध्ययनावर परिणाम झाला होता.

अर्जासाठी वाढवली मुदत
बारावीनंतर पाच वर्षांच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 जुलैपर्यंतची मुदत होती. सीईटी परीक्षेनंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी 15 हजार 91 विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र 5 जुलैपर्यंत 8 हजार 450 विद्यार्थ्यांनी कॅप राउंडच्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यातील 6 हजार 509 विद्यार्थ्यांनी पहिल्या कॅप राउंडसाठीची प्रक्रिया पूर्ण केली. सीईटी सेलकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या 1 हजार 841 विद्यार्थ्यांची कॅपसाठीची प्रक्रिया अपूर्ण असून, 6 हजार 641 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून आजपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत वाढवण्यात आली होती.

Web Title: Ritual courses 1500 seats empty education