तिहेरी अपघातात एक ठार चार जखमी; भाऊबीजेला निघालेली बहिण रुग्णालयात

तिहेरी अपघातात एक ठार चार जखमी; भाऊबीजेला निघालेली बहिण रुग्णालयात

सोयगाव : सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरील तिहेरी अपघातात एक ठार चार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामध्ये दुचाकीवरील एकजन जागीच ठार झाला असून दुचाकीचालक या विचित्र अपघातात वाचला आहे. या अपघातात कार चालक व दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जळगावच्या खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ठार झालेल्या दुचाकीवरील मयत तरुणावर सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कवली गावाकडून सोयगावकडे जाणाऱ्या दुचाकी क्र-एम-एच-19 सी. एस-6552 व पिंपळगावकडून बहुलखेड्याकडे जाणाऱ्या दुचाकी क्र-जि-जे ए-ए-0246 दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळून सोयगाव वरुण बहुलखेड्याकडे जाणाऱ्या कार क्र-एम एच-28 व्ही-6321 कारवर आदळून झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात दुचाकीवरील स्वार अरुण माणिक केंडे (वय 27 रा कवली ता. सोयगाव) याचा जागीच ठार झाला असून, दुचाकीवरील योगिता रवींद्र केंडे, ज्ञानेश्वर माणिक केंडे (दोन्ही रा.कवली) गंभीर जखमी झाले आहे.

दरम्यान, कारचालक बबलू अर्जुन पाटील (रा.बहुलखेडा) हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच जखमींना अनेकांनी तातडीने उपचारासाठी नेण्यासाठी मदत कार्य केले. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख शकील, उपनिरीक्षक गणेश जागडे, जमादार संतोष पाईकराव आदींनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. रात्री उशिरा पर्यंत पिंपळगाव(हरे)ता.पाचोरा येथील दुचाकीधारक मोहन दिनकर सावळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती.

चार गावांचा जमाव-
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी निंबायती, जरंडी, बहुलखेडा, कवली या चार गावांचा नागरिकांचा मोठा जमाव जमल्याने सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, रात्री उशिरापर्यंत सोयगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली होती.

महिलेची भाऊबीज रुग्णालयात-
दुचाकीवरील महिला योगिता रवींद्र केंडे ही कवली येथून पतीच्या भावांसोबत भाऊबीजसाठी दुचाकीवर शहापूर ता.जामनेर कडे जात होती, परंतु निंबायती फाट्या जवळील सुकी नदीच्या पळसाडी जवळ झालेल्या अपघातात जखमी झाल्याने तिची भाऊबीज रुग्णालयातच होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com