Shiv Sena Agitation : तीस लाखांच्या रस्त्याची तीन महिन्यांत धूळधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule: Shiv Sena office bearers and activists protesting alleging that the concrete road in Indraprastha Colony has deteriorated in just three months

Shiv Sena Agitation : तीस लाखांच्या रस्त्याची तीन महिन्यांत धूळधाण

धुळे : महापालिकेने दलित वस्ती सुधार योजनेतून शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत तीन महिन्यांपूर्वी केलेल्या ३० लाख रुपये खर्चाच्या काँक्रिट रस्त्याची अक्षरशः धूळधाण झाली असून, महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा हा नमुना असल्याचा आरोप शिवसेनेने केला.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतर्फे महापालिकेच्या निकृष्ट कामांची आंदोलनाच्या माध्यमातून पोलखोल सुरू आहे, याच मालिकेत बुधवारी (ता. १८) इंद्रप्रस्थ कॉलनीतील रस्त्याचा पंचनामा केला. (Road dusting of three lakhs in three months Allegation of Shiv Sena Road in Indraprastha Colony Polkhol from Andolan dhule News)

हेही वाचा: Nashik News: अंमलदारासाठी आयुक्तांचे निरीक्षकांना अल्टिमेटम; कर्मचाऱ्यांअभावी पथके होईना कार्यान्वित!

धुळे महापालिकेच्या माध्यमातून झालेली कामे भ्रष्टाचारामुळे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगर शाखेतर्फे करण्यात येत आहे. या आरोपांच्या अनुषंगाने आठ दिवसांपासून सातत्याने विविध कामांचा निकृष्ट दर्जा दाखवून आंदोलन करण्यात येत आहे.

यात बुधवारी शहरातील गोंदूर रोडवरील इंद्रप्रस्थ कॉलनीतील रहिवाशांकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आंदोलन केल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२२ मधील इंद्रप्रस्थ कॉलनी ते सुशीनालादरम्यान रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी दोन टप्प्यांत हे काम करण्यात आले.

या रस्ता कामात सिमेंट व रेतीचा योग्य वापर न केल्याने हा रस्ता सद्यःस्थितीत जागोजागी उखडला असून, संपूर्ण रस्त्यावर सिमेंटची धूळ (फुफाटा) झाला आहे. त्यामुळे हा रस्ता सिमेंटचा की फफुाट्याचा, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News: जिल्हा बॅंकेने मागविली थकबाकीदारांची माहिती

तीस लाख रुपये खर्च

दोन टप्प्यांत झालेल्या या कामावर सुमारे ३० लाख रुपये खर्च करण्यात आले असून, कामाच्या सुमार दर्जामुळे अवघ्या तीन महिन्यांत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. धुळे शहरात हे एकमेव उदाहरण नसून शहरातील विविध भागांत झालेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचीही अशीच स्थिती आहे. कुठे खडी तर कुठे स्टील उखडून पडले आहे. त्यामुळेच काँक्रिट रस्त्यांपेक्षा खड्डेयुक्त डांबरी रस्तेच बरे होते, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. या रस्त्याची दुर्दशा दाखवत शिवसेनेने तेथे आंदोलन केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक देवीदास लोणारी, राजेश पटवारी, ललित माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, प्रवीण साळवे, मच्छिंद्र निकम, संदीप चौधरी, नाना शिंदे, नितीन जगताप, गुलाब धोबी, शुभम रणधीर, लक्ष्मण बोरसे यांच्यासह इतर कार्यकर्ते, परिसरातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान, अंदाजपत्रकानुसार कामे होत नसतील तर नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : कहांडळ वाडीत लष्करात असलेल्या भावंडांकडे भर दुपारी घरफोडी