रस्त्यांवरील फळविक्रेत्यांवर मेहेरबानी कुणाची?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

जळगाव - शहरातील मुख्य रस्त्यांसह चौकांमध्ये पुन्हा हॉकर्स, विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. यात सर्वांत जास्त फळविक्रेते असून, जिथे जागा मिळेल तिथे हातगाडी उभी करून व्यवसाय करत आहेत. खासगी जागांमध्ये देखील फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दुर्लक्ष होत असून, या फळविक्रेत्यांवर मेहेरबानी कुणाची? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील ११ मुख्य रस्त्यांवरील हॉकर्सच्या स्थलांतराची मोहीम राबविली होती. परंतु शिवाजीरोड येथील फळविक्रेत्यांनी पुन्हा बळिरामपेठ, सुभाष चौक यासह शहरातील मुख्य रस्त्यांवर बस्तान मांडले आहे. त्यातच शहरातील विविध रस्ते, चौकांमध्ये फळविक्रेते लोटगाड्या लागत असल्याने चौकांमध्ये त्यामुळे वाहतूक कोंडीची पुन्हा समस्या निर्माण झाली आहे.  

खासगी जागांवर अतिक्रमण 
शहरातील विविध ठिकाणाच्या मुख्य रस्त्यांवर फळ विक्रेत्यांचे दुकाने पुन्हा दिसू लागली आहेत. त्यातच  महाबळ रस्ता, नेरी नाका, गिरणा टाकी, रामानंदनगर, गणेश कॉलनी रस्त्यावर तर गिरणा टाकी रस्त्यालगत खासगी जागांमध्ये महापालिकेतून बांधकाम परवानगी न घेता दुकाने बांधून या फळविक्रेत्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. 

मुख्य चौकांमध्ये हातगाड्या 
बहिणाबाई उद्यानाजवळील महेश चौकात फळविक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या असतात. याच ठिकाणी बाजूलाच एका खासगी रिकाम्या जागेत तीन-चार दिवसांपूर्वी टरबूज एका विक्रेत्याने दुकान थाटले. त्यापाठोपाठ दोन -तीन दिवसांत टरबूज, आंबे आदी विविध फळविक्रेत्यांची दुकाने लागल्याने चौकातील वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. 

अतिक्रमण विभागाकडून होतोय दुजाभाव...
अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील विविध ‘नो हॉकर्स’ झोनमधील भाजीपाला तसेच अन्य विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. परंतु शहरातील विविध रस्त्यांवरील फळविक्रेत्यांवर कारवाई का केली जात नाही, त्यांच्यावर मेहेरबानी कुणाची? असा प्रश्‍न महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारवाईतून निर्माण होत आहे.

Web Title: road fruit sailer issue