वरखेडे रस्त्यावरील मोरीचे काम निकृष्ट 

दीपक कच्छवा
गुरुवार, 14 जून 2018

या मोरीच्या कामासंदर्भात मी संबंधित अभियंत्याकडुन अहवाल मागविला आहे.आठ ते दहा दिवसात या कामाचा अहवाल प्राप्त होईल.तेव्हाच नेमके काय आहे हे समजु शकेल.
- प्रशांत सोनवणे, अधिक्षक अभियंता जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : वरखेडे (ता.चाळीसगाव) गावाजवळील रस्त्याच्या मोरीचे काम करतांना जुन्या मोरीच्या भिंतीला प्लास्टर करून नव्याने काम करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.  त्यामुळे भविष्यात या मोरीवर धोका होवुन अपघात होण्याची शक्यता आहे.ही परीस्थिती पहाता झालेल्या कामाची चौकशी करून दुसऱ्या बाजूची मोरीची भिंत नव्याने बांधावी अशी मागणी होत आहे.
  
सध्या भडगाव- येवला राज्यमार्गाचे काम सुरू आहे. वरखेडे ते मेहुणबारे दरम्यान रस्त्यावर ठीक ठीकाणी मोरींचे कामे करण्यात आली आहेत. वरखेडे गावापासून आर्धा किलोमीटर अंतरावर जुन्या ब्रिटीश कालीन मोरीचे काम  करण्यात आले.या कामासाठी   गिरणा पात्रातून अनाधिकृत  वाळु उपसा देखील करण्यात आला. काम चांगले होईल यासाठी ग्रामस्थांनी वाळू उपशाला विरोधदेखील केला नाही. शासनाचा पैसा या मोरीवर कसा कमी खर्च होईल व  कसा वाचविता येईल याचा प्रयत्न या कामावरून दिसुन आला आहे. 

बांधकाम करण्याचा नविन फंडा 
या  मोरीचे काम झाल्यानंतर एक बाजु नविन करण्यात आली. दुसर्‍या बाजुला जुन्या मोरीची भिंत होती,ती तशीच ठेवली व ती नव्याने केलेचे दिसण्यासाठी या भिंतीलाच वरून सिंमेट प्लास्टर करण्यात आले आहे, वास्तविक  ही मोरी जुनीच आहे.वास्तविक हा रस्ता प्रचंड वर्दळीचा असल्याने जुनी भिंत जास्त दिवस टिकू शकणार नाही.त्यामुळे हे काम देखील नव्याने करावे आशी मागणी होत आहे.

राजकीय पदाधिकार्यांचा कामात हस्तक्षेप
मोरीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.हे काम करतांना संबंधित विभागासह ठेकेदाराशी राजकीय पदाधिकार्यांनी अर्थिक हितसंबंध जोपासल्याचे दिसुन येत आहे.जुने काम नविन केल्याचे तेव्हाच दाखविले जाते, जेव्हा राजकीय वरदहस्त असतो.असा प्रकार या कामातही दिसुन येत असल्याने वरिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष येऊन पहाणी करावी , व अनाधिकृतरित्या काम झाले असेल तर दोषींवर कारवाई करावी , अशी मागणी होत आहे.

या मोरीच्या कामासंदर्भात मी संबंधित अभियंत्याकडुन अहवाल मागविला आहे.आठ ते दहा दिवसात या कामाचा अहवाल प्राप्त होईल.तेव्हाच नेमके काय आहे हे समजु शकेल.
- प्रशांत सोनवणे, अधिक्षक अभियंता जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: road work in warkhade