एकट्या महिलेला मारहाण करून अज्ञात महिलांनी केली जबरी चोरी

Untitled-1.jpg
Untitled-1.jpg

नांदगाव : भरदुपारी एकट्या असलेल्या महिलेचे हातपाय बांधून मारहाण करून पन्नास हजार रुपयांची जबरी चोरी झाल्याच्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे सध्या सोशल मिडीयावर चोर आल्याच्या अफवांना पेव फुटले असताना पोलिसांनी कालच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते. या आवाहनाच्या पार्शवभूमीवर तालुक्यातील भौरी येथे हा चोरीचा प्रकार ऐन दुपारी घडल्याने मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला येवला कि नांदगाव हद्दीत हा गुन्हा घडला याचीच चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. येवला पोलिसांनी आपल्याकडे असा प्रकार घडल्याचा नकार दिल्यावर सदर प्रकाराची नांदगाव पोलिसात दाखल होत असल्याचा उलगडा झाला. 

भौरी येथील गावाच्या हांकेपासून येवला तालुक्यातल्या सोमठाण जोशच्या शिवरालगत राहणाऱ्या गोजरबाई लक्ष्मण गायकवाड (वय ५५) गायकवाड वस्तीत दुपारी बारा वाजेच्या शेतातल्या जनावरांना चार पाणी करीत होत्या. घरात ठोकठाकच आवाज येऊ लागल्याने त्यांनी घरात जाऊन बघितले असता सहावारी साडी नेसलेल्या व तोंडावर पदर घेतलेल्या दोन अनोळखी महिला पैसे ठेवलेल्या पेटीचे कुलूप तोडताना दिसल्या. या पेटीमध्ये त्यांचा नातू नामदेव याने सकाळी नांदगावला जाऊन एटीएम मधून काढून आणलेले चाळीस हजार व घरातली अगोदरचे दहा हजार रुपये अशी रोकडा होती. जी ट्रॅकटरचा हप्ता भरण्यासाठी आणलेली रक्कम होती. मुलगा भाऊसाहेब, सून छायाबाई, मुलगी अलकाबाई असे सगळे वैजापूरला गेले असल्याने नातू व गोजरबाई घरात होत्या. नातू ट्रॅकटर घेऊन गेल्याने त्या एकट्या होत्या. त्यानं एकटे बघून मारहाण करीत रक्कम लुटण्यात आली. या लुटीच्या घाटाने नंतर नातू नामदेव माघारी आला असता. आजीला बांधलेल्या अवस्थेत त्याने बघितले आणि त्याने त्यांची सुटका केली. मदतीसाठी आरडाओरड केली व नंतर पोलिसाना कळविण्यात आले. 

भेदरलेल्या गोजराबाईंना सांयकाळी उशिरा नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.  डॉक्टर रोहन बोरसे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. अचानक झालेल्या मारहाणीमुळे गोजरबाईंची मानसिक स्थिती दोलायमान झालेली होती; त्यांना ग्रामस्थांनी धीर दिला. याबाबत नांदगाव पोलिसात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असताना. ठाणे अंमलदार पाटील यांनी गुन्हा दाखल होत असल्याची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरूच होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com