Dhule : काही तासांतच लुटारू जेरबंद; LCBची कारवाई | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Superintendent of Police Praveen Kumar Patil, Additional Superintendent of Police Prashant Bachhao

Dhule : काही तासांतच लुटारू जेरबंद; LCBची कारवाई

धुळे : हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याच्या हातातील मोबाईल व पॅन्टच्या खिशातील पैसे हिसकावून पळून गेलेल्या लुटारूंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासांतच जेरबंद केले. लुटारूंकडून दोन मोबाईलसह सहा हजार रुपयेही पथकाने हस्तगत केले. (Robbers jailed within hours Action by LCB Dhule latest marathi news)

नकाणे येथील पृथ्वीराज पाटील यांचा मुलगा देवेंद्र पाटील गुरुवारी (ता. १८) पहाटे सव्वापाचच्या सुमारास नातेवाइकांना घेऊन जाण्यासाठी शहरातील कृष्णा हॉटेलजवळील बायपास रोडने पायी जात होता. त्यादरम्यान दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी देवेंद्रच्या हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याच्या हातातील मोबाईल व पॅन्टच्या खिशातील १६०० रुपये हिसकावून नेले.

याबाबत पृथ्वीराज पाटील यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने गोपाल गोपी रावलकर (वय २१, रा. जानकीनगर, कंजरवाडा, सिंधी कॉलनी रोड, जळगाव) यास जळगाव येथून ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने हा गुन्हा त्याचा मेहुणा शंकर रतन साळुंखे (वय २२, रा. क्रांती चौक, चित्तोड रोड, धुळे) व साहील सुनील केदार (रा. नारायण मास्तर चाळ, चित्तोड रोड, धुळे) यांच्यासह मिळून केल्याची कबुली दिली. तसेच त्याने देवेंद्र पाटील याच्याकडून हिसकावून घेतलला मोबाईलही काढून दिला. दरम्यान, शंकर साळुंखे यालाही क्रांती चौकातील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा: खासगी संभाषणात संयम गमावू नका; Social Mediaवरील ‘व्यवहार’ होतोय रेकॉर्ड

त्यांच्याकडून सहा हजार व पाच हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले. साहील केदार फरारी असून, त्याचा शोध सुरू आहे. दोघांनाही तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शंकर साळुंखे यांच्यावर शहर पोलिसांत दोन, तर साहिल केदार याच्यावर उल्हासनगर येथील सेंट्रल पोलिस ठाण्यात पाच व धुळे शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक योगश राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाण, रफीक पठाण, योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलश सूर्यवंशी, राहुल गिरी, सागर शिर्के, सुनील पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन, गुलाब पाटील यांनी केली.

हेही वाचा: इगतपुरीत टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची लूट

Web Title: Robbers Jailed Within Hours Action By Lcb Dhule Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..