पैठणीचे दुकान फोडून 3 लाखाच्या पैठण्या लंपास

paithani
paithani

येवला : येवला शहराजवळील येवला कोपरगाव मार्गावरील एका पैठणीच्या दुकानात धुमाकूळ घालत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी सुमारे 3 लाखाच्या पैठण्या चोरून नेल्या. विशेष म्हणजे चोरटे हातमागावरील पैठणी काढून नेण्यास विसरले नाहीत.

या पैठण्या काढताना चोर आनंदाच्या भरात नाचतानाही सीसीटीव्ही कैद झाले आहेत. शहराजवळ तहसीलकडे जाणाऱ्या येवला कोपरगाव रस्त्यावर नाकोड पैठणीचे भव्य दुकान आहे. याठिकाणी पैठणीचे उत्पादनासह विक्रीही होत असते. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश करत उच्च किमतीच्या व दर्जेदार स्वरूपाच्या सुमारे 3 लाखाच्या पैठण्या गायब केल्या आहेत.

आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला चोरट्यांनी हातमागावर तयार करण्यासाठी लावलेल्या पैठणीही सोडल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरी करताना चोरटे सीसीटीवी मध्ये कैद झाले असून पोलिस या आगळ्यावेगळ्या चोरीचा तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com