विजया बँकेवर दरोड्याचा प्रयत्न; बँक उपव्यवस्थापक ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

निंबोल (ता. रावेर) : येथील विजया शाखेवर दुपारी सव्वादोनच्या सुमारास दोन हेल्मेटधारी चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांना बँक अधिकारी करण नेगे यांनी विरोध केला असता त्यांच्या छातीत बंदूकीच्या दोन गोळ्या झाडण्यात आल्या.

बँकेतील अन्य कर्मचाऱ्यांनी बँकेतील सायरन वाजवल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. सायरन आवाज ऐकून मसाकाचे व्हा. चेअरमन भागवत पाटील, मोहन पाटील, पं.स. सदस्य जितु पाटील यांनी बॅकेकडे धाव घेत मॅनेजर करण नेगे यांना उचलून उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना वाटेत त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी निभोरा पोलिस स्थानकाचे सहपोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे त्यांच्या सहकाऱ्यासोबत बँकेत दाखल झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery on Vijaya Bank and assistant manager dies