नाशिकच्या "मॅग्नम'मध्ये रोबोद्वारे अँजिओप्लास्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

रुग्णाची सुरवातीपासून अखेरपर्यंत बंद पडलेली नस रोबोद्वारे उघडून त्यात 60 एम. एम. लांबीचा स्टेन्ट यशस्वीरीत्या बसविण्यात आला आहे. एवढ्या लांबीचा स्टेन्ट रोबोद्वारे बसविण्याची अशी घटना जगात नाशिक येथील मॅग्नम हॉर्ट इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा घडली आहे, असा दावा डॉ. मनोज चोपडा यांनी मंगळवारी केला.

नाशिक - रुग्णाची सुरवातीपासून अखेरपर्यंत बंद पडलेली नस रोबोद्वारे उघडून त्यात 60 एम. एम. लांबीचा स्टेन्ट यशस्वीरीत्या बसविण्यात आला आहे. एवढ्या लांबीचा स्टेन्ट रोबोद्वारे बसविण्याची अशी घटना जगात नाशिक येथील मॅग्नम हॉर्ट इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा घडली आहे, असा दावा डॉ. मनोज चोपडा यांनी मंगळवारी केला. अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून अशी शस्त्रक्रिया करणाऱ्या जगातील सर्वोत्कृष्ट दहा रुग्णालयांच्या यादीत मॅग्नम हॉर्ट इन्स्टिट्यूटचा समावेश झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. चोपडा म्हणाले, की हृदयरोगावरील जागतिक दर्जाची अत्याधुनिक उपचार प्रणाली अर्थात "एफडीए' प्रमाणित अँजिओप्लास्टिसाठीचा रोबो मॅग्नम हॉर्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाला आहे. या रोबोची निर्मिती "कोरिंडस' कंपनीने केली आहे. जगातला दहावा, पूर्व आशिया व युरोप खंडातील दुसरा तर महाराष्ट्रातला पहिला असलेला हा रोबो नाशिकमध्ये आला आहे. रोबो चालविण्यासाठीचे प्रशिक्षण मी जर्मनीत घेतले. ज्या शस्त्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट व कठीण असतात अशा शस्त्रक्रिया रोबोच्या सहाय्याने केल्यास त्यांचा यशस्वी होण्याचा दर हा 100 टक्के आहे.

मॅग्नम मध्ये आजवर जवळपास 50 शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या गेल्या आहेत. 60 एम. एम. लांबीचा स्टेन्ट बसविण्याची पहिली शस्त्रक्रिया करणारी संस्था म्हणून नाशिकच्या मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटची नोंद आता जागतिक पातळीवर झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robotic Angioplasty in Magnum Heart Institute Successs