रोकडोबावाडी दुहेरी खुनातील आठ संशयित गजाआड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

नाशिक - दोन दिवसांपूर्वी रोकडोबावाडीत रात्रीच्या सुमारास झालेल्या दुहेरी खुनाचा उलगडा झाला असून, याप्रकरणी आठ संशयितांना अटक करण्यात आली, तर दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा प्रकार जुन्या वादाच्या कुरापतीतून झाला असल्याचे पुढे आले. 

गेल्य सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रोकडोबावाडीतील वालदेवी नदीकिनारी तिघे जखमी स्थितीमध्ये आढळून आले होते. यात अकबर शेख हा जागीच ठार, तर गुलाम शेख उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला होता. तिसरा गंभीर जखमी संदीप जैन याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याचदरम्यान जिल्हा रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांसमक्ष शवविच्छेदन करणारे डॉक्‍टर घटनास्थळी गेले. फॉरेन्सिक व्हॅनमार्फतही दोन वेळा घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा करण्यात आले. डॉ. ए. बी. पवार आणि डॉ. धूम यांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालाने तपासाला दिशा मिळाल्याचे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी आज स्पष्ट केले.  घटनास्थळावरून काही संशयित पळत गेल्याचे नागरिकांनी पाहिले होते. 

संशयित आतीश कैलास निकम (रा. रोकडोबावाडी) यास चौकशीसाठी ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता, खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी संशियत नितीन निवृत्ती बनकर (रा. रोकडोबावाडी), प्रशांत नाना जाधव (रा. जाधव मळा), आकाश नामदेव खताळे (रा. विहितगाव), अमोल अंबादास पठाडे (रा. विहितगाव), गोविंदा शंकर इंगोले (रा. विहितगाव) यासह एका अल्पवयीन मुलासह सात जणांना अटक करण्यात आली. आठवा संशयित विशाल पगारे यास रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, देवराज बोरसे, गुन्हे शाखा युनिट तीनचे नारायण न्याहाळदे, समीर चंद्रमोरे, रवी बागूल तपास करीत आहेत.

शेख कुटुंबीयांना अनेकदा धमक्‍या

वर्षभरापूर्वी रोकडोबावाडीत गुलाम शेख यांच्या चुलत भावाचा खून झाला होता. त्या प्रकरणात गुलाम शेख यांचा भाऊ फिर्यादी होता. या प्रकरणावरून यापूर्वीही शेख कुटुंबीयांना अनेकदा धमक्‍याही देण्यात आल्या होत्या. सोमवारी सायंकाळी सहापासून तिघेही दारू पीत बसले होते. रात्री अकबरच्या डोक्‍यात तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला होता, तर गुलामला जबर मुकामार असल्याने त्याच्या शरीरातील मुख्य नस तुटल्याने मृत्यू झाला.

Web Title: Rokodobavadi arrested eight suspected double murder case