PHOTOS : कोंबडा माशाची मिजासच भारी!...'इतक्या' दराचा यंदा तुर्रा 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 5 December 2019

कोंबडा मासा सारखाच दिसणारा मात्र अन्य धरणे, नदी तलावाच्या पाण्यात तयार झालेला कोंबडा मासा व गिरणा धरणातील कोंबडा याची तुलना होऊच शकत नाही. उबदार थंडीत माशातून मिळणारी प्रथिने शरीराला पोषक असल्याने सगळ्या प्रकारचे मासे बाजारात विक्रीला येत असताना गिरणा धरणातील कोंबडा मात्र सध्या सहजासहजी मिळत नाही. पारखी नजर त्याला बरोबर ओळखतात.

नाशिक : हिवाळ्यासह बारमाही खवय्यांची मागणी असलेला कोंबडा मासा यंदा अडीचशे रुपये किलोने विक्री केला. जातोय माशांना मागणी असते, मात्र बाजारात दिसणाऱ्या या माशांच्या गर्दीत जिभेवर दीर्घकाळ चव रेंगाळणारा गिरणा धरणातील कोंबडा मासा मात्र सहजासहजी मिळत नाही. मासा खावा तर गिरणेचा कोंबडा मासा, अशी खवय्ये मंडळींची धारणा असते. 

गिरणा धरणातील कोंबडा याची तुलना होऊच शकत नाही

कोंबडा मासा सारखाच दिसणारा मात्र अन्य धरणे, नदी तलावाच्या पाण्यात तयार झालेला कोंबडा मासा व गिरणा धरणातील कोंबडा याची तुलना होऊच शकत नाही. उबदार थंडीत माशातून मिळणारी प्रथिने शरीराला पोषक असल्याने सगळ्या प्रकारचे मासे बाजारात विक्रीला येत असताना गिरणा धरणातील कोंबडा मात्र सध्या सहजासहजी मिळत नाही. पारखी नजर त्याला बरोबर ओळखतात. सध्या गिरणा धरण आठ वर्षांनंतर ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांची मासे खाण्यासाठी मोठी गर्दी धरण क्षेत्रावर दिसते. या ठिकाणी कोंबडा मासा म्हणून विक्रीला असणारा मासा त्याच धरणाच्या पाण्यातील असेलच याची हमी नाही. 

Image may contain: water and outdoor

गिरणेचा कोंबडा मासा अलीकडच्या दोन वर्षांपासून मिळेनासा
बहुतेक विक्रेते मालेगावच्या मासळी बाजारात भिगवणहून आणलेल्या लिलावातील मासे विकतात. गिरणा धरणात छोट्या विक्रेत्यांना मासेमारी करू दिली जात नसल्याने गिरणेच्या पाण्यातला कोंबडा अलीकडच्या दोन वर्षांपासून मिळेनासा झाला आहे. गिरणा धरणाची जलाशयाची क्षमता व आवाका मोठा असल्यामुळे विविध जातींची मत्स्यबीजे त्यात सोडली जातात. कोंबड्यासारखी मत्स्यबीजे गेली अनेक वर्षे मत्स्यशेतीसाठी फायदेशीर ठरलेली आहेत. बारमाही उत्पन्न व बऱ्यापैकी नफा हे सूत्र त्यामागे असल्याने कोंबडा मासा अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. 

चवीला रुचकर व कमी काटे

चिकनऐवजी मासे खाताना चवीला रुचकर व कमी काटे यामुळे खवय्ये मंडळींकडून त्याची मागणी करतात. लालसर कल्ले व चंदेरीपणामुळे तो दिसण्यासही आकर्षक व खाण्यासही पोषक असतो. शेकडोंच्या संख्येने दररोज पर्यटक गिरणा धरणावर येतात. साधारणपणे दोनशे ते तीनशे किलो माशांची विक्री होते. मच्छी फ्रायसाठी शंभर ते दीडशे रुपये दराने छोटे हॉटेलचालक ते तयार करून देतात. 

Image may contain: outdoor and water

हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय.....

मासेमारीवर परिणाम 
गिरणा धरणावर परवानाधारक ठेकेदाराखेरीज कुणालाही जाऊ दिले जात नसल्याने धरणाखालील पाण्याची आवर्तने सोडल्यानंतर वाहणाऱ्या नदीपात्राच्या पाण्यात किरकोळ प्रमाणात मासे सापडतात. मात्र कोंबडा मासा सहजासहजी गळाला लागत नाही. गिरणेच्या पाण्याची गोडी व त्यातील घटकमूल्ये यावर पोसलेला कोंबडा मासा तीन किलोंपासून ते 35 किलोंच्या वजनाएवढा असू शकतो. त्यामुळे लहान आकाराचाही कोंबडा हाताशी लागत नाही. सायगाव पिलखोड, नाग्यासाक्‍या माणिकपुंज व अन्य लहान-मोठी धरणे, तलाव यातही कोंबडा मासा मिळतो. मात्र त्याला गिरणाची सर येत नाही. 

Image may contain: outdoor

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

गिरणा धरणाची खासियत असलेल्या मासळीला खवय्यांकडून मागणी
अलीकडेच मोठ्या प्रमाणात पावसामुळे वारंवार आलेल्या पुरामुळे महागडी मत्स्यबीजे वाहून गेल्याने नुकसान झाले. स्थानिक आदिवासी मंडळींना त्यांच्या हक्काचा रोजगार म्हणून आपण प्रयत्न करतो. -संगीता वाघ, मच्छीमारांच्या स्थानिक नेत्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rooster fish prices increased Nashik Marathi News