Nandurbar News : गंगापूरजवळ धावत्या ट्रकला भीषण आग

fire truck
fire truckesakal

नवापूर(जि. नंदुरबार) : तालुक्यातील विसरवाडीपासून तीन किलोमीटरवर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावाच्या शिवारात महामार्गावर दुपारी चारला धावत्या ट्रकला आग लागली.

आगीत ट्रक जळून खाक झाला. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. (running truck caught fire near Gangapur nandurbar news)

ट्रक (जीजे २६, यू ९६४६) आंध्र प्रदेशातून भावनगर येथे लोखंड भरून जात असताना ट्रकचा टायर गरम झाल्याने अचानक आगीच्या ठिणग्या निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने ट्रक उभा करून बघितले असता आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले.

बघता बघता संपूर्ण ट्रकला आग लागली. दूरदूरपर्यंत आगीचे लोळ दिसू लागले. ट्रक संपूर्ण जळून खाक झाला. ट्रकवरील चालक व सहचालक घाबरून दूर पळवून गेल्याने जीवितहानी टळाली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

fire truck
Dhule Crime News : मोहाडीमधील तरुणाचा शिरच्छेद करत निर्घृण खून

आग इतकी भयानक होती, की टायर फुटण्याचा आवाज दूरपर्यंत येत असल्याने आजूबाजूचे नागरिक, हॉटेल व्यावसायिक भयभीत झाले होते. विसरवाडी पोलिस ठाण्यात ही माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक भूषण बैसाणे,

हवालदार पिंटू पावरा, अतुल पानपाटील, गृहरक्षक दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाला दूरध्वनी करून पाचारण करण्यात आले. ट्रकला महामार्गावर आग लागल्याने रस्त्यावर दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती.

fire truck
Dhule News : बोदगाव येथे गाय फस्त; बिबट्या जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com