महापुरुषांचे बलिदान मातृभूमीसाठीच

संजय चव्हाण 
शनिवार, 16 जून 2018

सटाणा : महापुरुषांनी कोणत्याही जाती, धर्म व स्वार्थासाठी नाही तर आपल्या मातुभूमीसाठी सर्वस्वपणाला लावून बलिदान दिले. त्यांच्या विचारांचा दीपस्तंभाप्रमाणे उपयोग करून प्रत्येक समाज घटकाला मदत करावी. आजचे सामाजिक प्रश्न युद्धाने सुटणारे नाहीत तर त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज शनिवार (ता.१६) रोजी येथे केले.

सटाणा : महापुरुषांनी कोणत्याही जाती, धर्म व स्वार्थासाठी नाही तर आपल्या मातुभूमीसाठी सर्वस्वपणाला लावून बलिदान दिले. त्यांच्या विचारांचा दीपस्तंभाप्रमाणे उपयोग करून प्रत्येक समाज घटकाला मदत करावी. आजचे सामाजिक प्रश्न युद्धाने सुटणारे नाहीत तर त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज शनिवार (ता.१६) रोजी येथे केले.

अखिल महाराष्ट्र बागलाण तालुका महाराणा प्रताप क्रांतिदल, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती व राजपूत समाजबांधवांतर्फे क्रांतिसूर्य, विररत्न महाराणा प्रताप यांचा ४७८ जयंती उत्सव आज सटाणा शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त येथील दोधेश्वर नाक्यावरील (कै.) पं. ध. पाटील चौकात आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र कुंवर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास बच्छाव, नगरसेवक राहुल सोनवणे, नितीन सोनवणे, राकेश खैरनार, महेश देवरे, पंडित अहिरे, दत्तू बैताडे, नाना मोरकर, क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, उपाध्यक्ष लखन पवार आदी उपस्थित होते.

माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष मोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जितेंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. 
आज रमजान ईद असल्याने अखिल महाराष्ट्र महाराणा प्रताप क्रांतिदलातर्फे आज सकाळी नमाजपठणासाठी जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जयंती उत्सव अध्यक्ष भाऊसाहेब वाघ, धनसिंग वाघ, नंदू पवार, प्रभाकर पवार, दीपक ठोके, संदीप पवार, भरत पवार, नथाभाऊ ठोके, गोकुळ पवार, सुरेश पवार, तात्याभाऊ सोळंके, सोनू बागुल, अरुण पवार, दत्तू पवार, विठोबा जाधव, कल्याणसिंग वाघ, भाऊसिंग पवार, पंडितराव अहिरे, स्वप्नील ठोके, डी. बी. चव्हाण, श्याम बगडाने, आदींसह समाजबांधव व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

जितेंद्र पवार यांनी सुत्रसंचालन केले तर राजेंद्र सावकार यांनी आभार मानले.
 दरम्यान, आज सायंकाळी शहरातून सजविलेल्या रथावरून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तहसील आवारातून क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. अग्रभागी बॅंडपथक, ध्वजधारी सैनिक, घोड्यांच्या सजविलेल्या रथावरील महाराणा प्रतापांची प्रतिमा व समाजबांधवांची शिस्तबद्ध मिरवणूक लक्ष वेधून घेत होती. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरु होती. 

जयंती उत्सवानिमित्त रक्तदान शिबीर
जयंती उत्सवानिमित्त बागलाण तालुका महाराणा प्रताप क्रांतिदलातर्फे दोधेश्वर नाक्यावर आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते झाले. शिबिरात दिवसभरात ३०० नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी राजपूत समाजातील इयत्ता १० व १२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
 

Web Title: The sacrifices of great men only for the motherland