नशेबाज,जुगारी मजेत...नागरिक मात्र त्रस्त...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

प्रतिबंधक क्षेत्र असूनही नशेबाजांसह गुंड प्रवृत्ती लोकांचा त्या ठिकाणी वावर दिसतो. सायंकाळी विशेषतः त्यांचा वावर जास्त असतो. याशिवाय जुगाराचे डावही या ठिकाणी खेळले जातात. बऱ्याच वेळा संशयितांमध्ये वाद होण्याच्या घटना घडतात. याचा परिणाम परिसरातील नागरिकांवर होतो. पोलिस व महापालिकेने याकडे लक्ष देऊन येथील जुगाऱ्यांवर, तसेच नशेबांजावर कारवाई करावी. पोलिसानी नेहमी येथे गस्त घातल्यास अशा गोष्टीना आळा बसण्यास मदत होईल, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

नाशिक : महापालिकेच्या सादिकशाह जलकुंभाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शिवाय तो नशेबाजांचा अड्डा ठरत आहे. प्रतिबंधक क्षेत्र असूनही जुगारी नशेबाजांचा मोठ्या प्रमाणावर वावर या ठिकाणी असल्याने परिसरातील नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. 

सादिकशाह जलकुंभाचा परिसर बनला नशेबाजांचा अड्डा 

बडी दर्गा भागातील सादिकशाह जलकुंभ अतिशय जुना असल्याने त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जलकुंभाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने त्याच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जलकुंभाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनावश्‍यक झाडेझुडपे वाढली आहेत. येथील उच्चदाबाच्या डीपीला त्यांचा विळखा पडला आहे. ठिकठिकाणी गळती लागली आहे. 24 तास गळती सुरूच राहिल्याने दैनंदिन शेकडो लिटर पाणी वाया जाते. त्याचप्रमाणे जलकुंभाची डागडुजी नाही. अनेक वर्षांपासून रंगरंगोटीला मुहूर्त लागलेला नाही. जलकुंभाच्या लोखंडी शिडीला गंज चढला आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्षायामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे.

 नागरिक त्रस्त, प्रतिबंधक क्षेत्रात धुडगूस,

प्रतिबंधक क्षेत्र असूनही नशेबाजांसह गुंड प्रवृत्ती लोकांचा त्या ठिकाणी वावर दिसतो. सायंकाळी विशेषतः त्यांचा वावर जास्त असतो. याशिवाय जुगाराचे डावही या ठिकाणी खेळले जातात. बऱ्याच वेळा संशयितांमध्ये वाद होण्याच्या घटना घडतात. याचा परिणाम परिसरातील नागरिकांवर होतो. पोलिस व महापालिकेने याकडे लक्ष देऊन येथील जुगाऱ्यांवर, तसेच नशेबांजावर कारवाई करावी. पोलिसानी नेहमी येथे गस्त घातल्यास अशा गोष्टीना आळा बसण्यास मदत होईल, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. 

Image may contain: sky and outdoor

दुर्घटनेला निमंत्रण 

सादिकशाह जलकुंभास विविध ठिकाणी गळती लागली आहे. बऱ्याच वर्षांपासून त्याची डागडुजी झालेली नाही. महापालिकेने याकडे लक्ष देऊन जलकुंभाची दुरुस्ती करावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. गळतीमुळे केवळ पाणीच वाया जाते असे नाही, तर सततच्या गळतीने कुंभाचा भाग कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्‍यता नागरिक व्यक्त करत आहेत. दुर्घटना होण्यापूर्वी महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. 24 तास पाणीगळती, अस्वच्छता, डागडुजीचा अभाव

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadikshah Jalkumbha's premises became a drunkard's base Nashik News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: