श्री क्षेत्र नस्तनपूरला सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी पोलीस चौकीसाठी मंजुरी

संजीव निकम
मंगळवार, 20 मार्च 2018

नांदगाव : श्री क्षेत्र - नस्तनपूर (ता.नांदगाव,जि.नाशिक) येथे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कायमस्वरूपी पोलीस चौकीच्या निर्मितीस शासनाची मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आ.जयवंतराव जाधव यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नांदगाव : श्री क्षेत्र - नस्तनपूर (ता.नांदगाव,जि.नाशिक) येथे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कायमस्वरूपी पोलीस चौकीच्या निर्मितीस शासनाची मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आ.जयवंतराव जाधव यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आ.जयवंतराव जाधव यांनी आपल्या तारांकित प्रश्नात म्हटले आहे की, नस्तनपूर (ता.नांदगाव,जि.नाशिक) येथे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कायमस्वरूपी पोलीस चौकीची निर्मिती करण्याची गरज असून त्यासाठी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यामुळे शासनाने श्री.शनिदेव मंदिर येथे भाविक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर पोलीस चौकीची निर्मिती करावी अशी मागणी त्यांनी आपल्या तारांकित केली.

यावर आपल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आस्थापनेवरील नांदगाव पोलीस ठाणे अंतर्गत नस्तनपूर येथे पोलीस चौकीची निर्मिती करण्याचा निर्णयास दि. ३ जानेवारी २०१८ रोजी मान्यता दिली असून लवकरच या ठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती केली जाईल असे त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

नस्तनपूर देवस्थान येथे गेल्या काही दिवसापूर्वी श्री.शनीदेव महाराज यांच्या मूर्ती जवळील मौलिक दागिन्यांची चोरी झाली होती. त्यामुळे ट्रस्टचे कार्याध्यक्ष माजी आमदार अनिल आहेर यांनी येथे कायमस्वरूपी पोलिस चौकी करण्याची मागणी केली होती.त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नांदगाव  विधानसभा मतदार संघाचे आ.पंकज भुजबळ व आ. जयवंतराव जाधव  यांनी नस्तनपूर येथील मंदिर परिसर, पर्यटक व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकीची निर्मिती करण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार केला होता तसेच विधिमंडळात तारांकित प्रश्न व इतर आयुधानद्वारे पाठपुरावा केला होता. आता या पोलीस चौकीस शासनाची मंजुरी मिळाली असून यामुळे येथे येणारे पर्यटक व भाविकांची सुरक्षिततेसाठी फायदा होणार आहे.

Web Title: for safety permanent police chauki sanction at nastanpur