शहीदांच्या कुटुंबीयांना आधार 

kopragaon shahid sunil valte family
kopragaon shahid sunil valte family

जळगाव ः देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात. प्रसंगी त्यांना विरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा; या भावनेने जळगावातील आर्या फाउंडेशन संस्था पुढे सरसावली असून शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांची मदत करीत आहे. त्यानुसार कोपरगाव येथे शहीद नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या कुटूंबियांना मदतीचा हात देण्यात आला. 

देशाचे रक्षण करतांना प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांच्या कुटुंबाना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे. जम्मू- काश्‍मीरमधील नवशेरा सेक्‍टरमध्ये अतिरेक्‍यांशी झालेल्या चकमकीत कोपरगावचे नायब सुभेदार सुनील वलटे शहीद झाले. शहीद सुनील वलटे यांच्या कुटूंबियांना मदतीसाठी आर्या फाउंडेशन पुढे आली. त्यानुसार नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या पत्नी मंगल वलटे यांच्या नावाचा 65 हजार रूपयांचा धनादेश त्यांचे घरी जाऊन फाउंडेशनचे प्रतिनिधी रवींद्र पाटील, रोशन शाह यांनी सुपुर्त केला. यावेळी कोपरगावचे अजय बाबुराव पहेलवान, शहीद नायब सुनील वलटे यांचे वडील रावसाहेब वलटे, आई सुशीला वलटे, पत्नी मंगल वलटे उपस्थित होते. शहीद नायब सुभेदार सुनील वलटे यांना वेदांत आणि मुलगी श्रद्धा अशी दोन मुले आहेत. 

सरपंच मदतीसाठी पुढे 
दहेगाव बोलका येथील सरपंच साधना रविंद्र देशमुख यांनी डॉ. धर्मेंद्र पाटील यांचे फोन करून आभार मानले. सदरील शहीद कुटुंबीयांना राहण्यासाठी पक्के घर नसल्याचे लक्षात आल्यावर डॉ. पाटील यांनी सरपंच यांना त्यासंदर्भात मदत करावी अशी विनंती केली. त्यावर त्यांना पक्के घरासाठी मदत करण्याचे आश्‍वासन सरपंच देशमुख यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com