दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून ‘सकाळ एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

या संस्थांचा सहभाग 
प्रदर्शनात संदीप युनिव्हर्सिटी, के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था, गुरू गोविंदसिंग फाउंडेशन, प्रवरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स, ब्राइट फ्यूचर एज्युकेशन, अरेना मल्टिमीडिया ॲन्ड ॲनिमेशन, युनिव्हर्सल फाउंडेशन, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स, सपकाळ नॉलेज हब, आर्किन इन्स्टिट्यूट, ॲस्पायर करिअर ॲकॅडमी, स्मार्ट एज्युकेशन, बॅंक ऑफ महाराष्ट्र, सरकार करिअर ॲकॅडमी, ‘सकाळ’ मनी इत्यादी स्टॉल असणार आहेत.

नाशिक - बारावीच्या निकालासह ‘सीईटी’, ‘नीट’चा निकाल जाहीर झाल्याने पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे दहावीच्या निकालाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते, अशा स्थितीत पाल्याच्या उज्ज्वल करिअरच्या निवडीसाठी पर्यायांच्या शोधात असलेल्या पालकांसाठी ‘सकाळ एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो-२०१९’ अत्यंत प्रभावी ठरणार आहे. शैक्षणिकविषयक प्रदर्शनाला शुक्रवार (ता. ७)पासून गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाच्या मैदानावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्‌घाटन होऊन प्रदर्शनाला सुरवात होत आहे.

करिअरविषयी पालक व विद्यार्थी अधिक सजग बनले असून, विविध पर्यायांचा अभ्यास करून मग शिक्षणक्रम निवडीकडे सध्या त्यांचा कल असल्याचे दिसते. दहावी, बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र यांसह अन्य विविध नावीन्यपूर्ण क्षेत्रांतील करिअरची संधी मिळविणे आव्हानात्मक असते. त्यास खूप वेळही द्यावा लागतो. अशा स्थितीत करिअरचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ‘सकाळ एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो-२०१९’ हे शैक्षणिक प्रदर्शन भरविण्यात येत आहे.

प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. प्रदर्शनातून अभ्यासक्रमांची माहिती, प्रवेशासाठीची पात्रता व अन्य उपयुक्‍त माहिती जाणून घेता येईल. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठातर्फे महाविद्यालयीन तरुणांसाठी होत असलेल्या ‘यिन समर यूथ समीट’च्या निमित्ताने प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचा पालक व विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. 

रविवारपर्यंत भेट देण्याची संधी 
या प्रदर्शनाचे टायटल स्पॉन्सर संदीप युनिव्हर्सिटी आहे. पॉवर्ड बाय के. के. वाघ शिक्षण संस्था असलेल्या या प्रदर्शनासाठी व्हेन्यू पार्टनर मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आहे. शुक्रवारी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होत असून, रविवार (ता. ९)पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन करिअरच्या पर्यायांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिका माहितीसाठी शरद धात्रक (९८९००१११२०) यांच्याशी संपर्क साधावा.

जॉब फेअरचेही आयोजन
या भव्य शैक्षणिक प्रदर्शनाबरोबरच कॅम्पस टू कॉर्पोरेट या थीमखाली ‘सकाळ’तर्फे जॉब फेअरही होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच नोकरीविषयक असलेल्या संधीची या माध्यमातून माहिती मिळणार आहेत.

जॉब फेअरमध्ये सायबर अँबेसीडर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ७० व्हॅकन्सी वेगवेगळ्या पदांसाठी उपलब्ध असणार आहेत. अपटर्न इंडिया टेक्‍नॉलॉजी या कंपनीत ३० पदाच्या व्हॅकन्सी आहेत. ड्रीमवेअर्स आयटी सोल्युशन या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या दहा व्हॅकन्सी आहेत. याशिवाय अनेक क्षेत्रातील नामांकित कंपन्या या जॉब फेअरमध्ये सहभागी आहेत. या संधीचे सोने करण्याची सुवर्णसंधी या जॉब फेअरमधून उपलब्ध होणार आहे, असे आवाहन ‘सकाळ’तर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Eduspire Admission Expo SSC HSC Student Career