सकाळ इफेक्ट: भोरस गावात गुरांना लसीकरण 

दीपक कच्छवा
शनिवार, 24 मार्च 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)- येथे दुधाळ जनावरांना "लाळ खुरकत' रोगाची लागण झाल्याने चार गाईंचा मृत्यू झाल्याची घटना 22 मार्च रोजी घडली होती. या संदर्भात 'सकाळ'मध्ये वस्तुनिष्ठ वृत्त झळकताच भोरस गावात पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी भेट देऊन गुरांचे दिवसभर लसीकरण केले.

भोरस (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी संभाजी पाटील यांच्या 13 दुभत्या गायींना 'लाळ खुरकत' आजाराची लागण झाली. त्यातल्या 4 गाई दगावल्या. दुसऱ्या पाच गायी व तीन वासरांनाही या रोगाची लागण झाली होती. या संदर्भात 'सकाळ'मध्ये भोरसला दुभत्या चार गायी मृत्युमुखी या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत,पशुसंवर्धन विभागाने गुरांच्या लसीकरणाबाबत सकाळी गावात दवंडी दिली. तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय डॉक्टरांनी भोरस गाठले व गावातील गुरांचे लसीकरण केले

सकाळच्या वृत्तामुळे मिळाल्या लसी
भोरस गावातील गुरांना 'लाळ खुरकत' आजाराची लागण झालेली असताना पशुवैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध नव्हत्या त्यामुळे गावातील पशुपालक त्रस्त झालेले होते. 'सकाळ'ने वस्तुनिष्ठ परिस्थिती माडंल्यामुळे गावासह परिसरातील गुरांना लसीकरणासाठी तातडीने लसी उपलब्ध झाल्या.

भोरसला गुरांना लागण झालेल्या 'लाळ खुरकत' रोगामुळे  चाळीसगाव तालुक्यातील 1 लाख 10 हजार पशुंना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नियोजन करून गावा गावात गुरांना लस देण्यात येतील. 
डॉ मेहुल राठोड 
प्रभारी पशुधन विकास अधिकारी चाळीसगाव

Web Title: sakal effect animal vaccines